राज्यपालांचे कारवाईचे आदेश, बच्चू कडू तडकाफडकी अकोल्याच्या दौऱ्यावर, नेमकं प्रकरण काय?

राज्यपालांनी आदेश दिल्यानंर अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडून तातडीनं जिल्हा दौऱ्यावर आहेत. बच्चू कडू वंचित बहूजन आघाडीनं ज्या रस्त्याची तक्रार केली त्याची पाहणी करणार आहेत.

राज्यपालांचे कारवाईचे आदेश, बच्चू कडू तडकाफडकी अकोल्याच्या दौऱ्यावर, नेमकं प्रकरण काय?
राज्यमंत्री बच्चू कडूImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Feb 27, 2022 | 5:06 PM

अकोला : शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्याविरोधात खटला चालवण्याचे आदेश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी दिले होते. राज्यपालांनी आदेश दिल्यानंर अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू तातडीनं जिल्हा दौऱ्यावर आहेत. बच्चू कडू वंचित बहूजन आघाडीनं ज्या रस्त्याची तक्रार केली त्याची पाहणी करणार आहेत. बच्चू कडू अकोट तालुक्यातील कुटासा ते कावसा रोडची पाहणी करणार आहेत. बनावट दस्ताऐवज बनवून शासकीय निधीचा (Government funds) अपहार केल्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीने बच्चू कडू यांच्याविरोधात राज्यपालांकडे तक्रार केली होती. त्यानंतर राज्यपालांनी अकोला पोलीस अधीक्षकांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे बच्चू कडू यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली होती.

बच्चू कडूंचा तडकाफडकी दैरा

अकोला जिल्हाचे पालकमंत्री बच्चू कडू तडका फडकी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले आहेत. वंचित बहुजन आघाडीने तक्रार केलेल्या रस्त्याची बच्चू कडू पाहणी करणार आहेत. अकोट तालुक्यातील कुटासा ते कावसा रोडच्या कामासंदर्भात बच्चू कडू पाहणी करणार आहेत. कालच राज्यपाल यांच्या कडून बच्चू कडू यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देणार पत्र देण्यात आलं होतं.

नेमक प्रकरण काय?

अकोला जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष पालकमंत्री बच्चू कड यांनी अस्तित्वात नसलेल्या विकास कामांवर निधी वळता करून शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडी तर्फे डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी अकोला पोलिसांत तक्रार दिली होती. परंतु, राजकीय दबावाखाली अकोला पोलिसांनी एफ.आय.आर. नोंदवीण्यास नकार दिला होता. त्यामुळे नाईलाज म्हणून आणि अकोला जिल्हा परिषदेची स्वायत्तता अखंडित राहण्याच्या दृष्टीने धैर्यवर्धन पुंडकर यांनी विद्यमान अकोला जिल्हा न्यायालयात कलम 156/3 खाली तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीवर सुनावणी होऊन 27 जानेवारी 2022 रोजी पालकमंत्री बच्चू कडू यांच्या विरुद्ध प्रथम दर्शनी दखलपात्र गुन्हा होत आहे. हे सिद्ध झाले असून त्यांच्या विरुद्ध एफ.आय.आर. कारवाई करण्याआधी विधानसभेचे अध्यक्ष / राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक असल्याने विद्यमान अकोला जिल्हा न्यायालयाने सदरहू प्रकरणात माननीय राज्यपाल यांचे निर्देश येण्यासाठी 90 दिवसांचा कालावधी दिला होता. परंतु, प्रथमदर्शनी दखलपात्र गुन्हा होत आहे, असे मत नोंदवून विद्यमान अकोला न्यायालयाने पालकमंत्री बच्चू कडूनी बनावट दस्तऐवज बनवून शासकीय निधी चा अपहार केला यावर शिक्कामोर्तब केलं होतं.

प्रकाश आंबेडकर यांच्याकडून राज्यपालांकडे तक्रार

वंचित बहूजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांनी राज्यपालांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी बच्चू कडूंवर कारवाई व्हावी यासाठी परवानगी देण्याची मागणी केली होती.

इतर बातम्या:

फोन टॅपिंग प्रकरणात फडणवीसांच्या भूमिकेची चौकशी करा, फोन टॅपिंगमागे नेमकं कोण?

रशिया-युक्रेन युद्धाचा भारतावर मोठा परिणाम, येत्या काळात पेट्रोल-डिझेलच्या दराचा भडका उडणार

Non Stop LIVE Update
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.