सावरकरांना खलनायक ठरवण्यामागे एक नियोजित कट, रोखठोकमधून राजनाथ सिंहांच्या वक्तव्याचा समाचार

त्यानंतर आता सामना रोखठोकमधूनही शिवसेनेने सावरकरांविषयी आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. या लेखात नायकावर चिखलफेक करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं म्हटलं गेलं आहे. "पारतंत्र्यात सावरकर हे सगळय़ांचे नायक होते. स्वातंत्र्यानंतर त्यांना खलनायक ठरवण्याचा प्रयत्न सुरू झाला तो आजही सुरूच आहे. आजही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातही सावरकर या देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत. सावरकरांविषयी द्वेष आणि विष पसरवूनही ते लोकांच्या मनावर अढळपणे विराजमान आहेत."

सावरकरांना खलनायक ठरवण्यामागे एक नियोजित कट, रोखठोकमधून राजनाथ सिंहांच्या वक्तव्याचा समाचार
Veer sawarkar
Follow us
| Updated on: Oct 24, 2021 | 8:43 AM

मुंबई : सध्या स्वातंत्र्य वीर सावरकरांवरुन राजकीय पक्षांमध्ये चांगलीच जुंपलेली पाहायला मिळत आहे. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले होते की, “गांधीजींच्या सांगण्यावरून सावरकरांनी माफी मागितली.” त्यांच्या या वक्तव्यावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सामना रोखठोकमधून चांगलाच समाचार घेतला आहे.

त्याबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत म्हटले होते की, “वीर सावरकर हे वीर सावरकर आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतः सावरकरवादी आहेत. कोणी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तर सूर्याचं तेजच त्याला जाळून टाकेल”.

त्यानंतर आता सामना रोखठोकमधूनही शिवसेनेने सावरकरांविषयी आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. या लेखात नायकावर चिखलफेक करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं म्हटलं गेलं आहे. “पारतंत्र्यात सावरकर हे सगळय़ांचे नायक होते. स्वातंत्र्यानंतर त्यांना खलनायक ठरवण्याचा प्रयत्न सुरू झाला तो आजही सुरूच आहे. आजही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातही सावरकर या देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत. सावरकरांविषयी द्वेष आणि विष पसरवूनही ते लोकांच्या मनावर अढळपणे विराजमान आहेत.”

सावरकर स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांचे मुकुटमणी

वीर सावरकर हे स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांचे मुकुटमणी होते. स्वातंत्र्यापूर्वी त्यांना परकीयांनी छळले व आजही स्वकीय त्यांचा छळ करीत आहेत. सावरकरांचे उत्तुंग क्रांतिकार्य, देशासाठी केलेला त्यांचा त्याग विसरून काही लोक सावरकरांना माफी मागून सुटलेला ‘वीर’ अशी संभावना करीत असतात. (हा एक कट आहे.) सावरकरांच्या माफीबाबत ज्या दंतकथा आहेत त्या अर्ध्याअधुऱ्या आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी नुकतेच एका भाषणात सांगितले, “गांधीजींच्या सांगण्यावरून सावरकरांनी माफी मागितली.” यावरून वादळ निर्माण झाले व सावरकरांच्या चारित्र्यहननाचे नवे उद्योग सुरू झाले. सावरकरांनी त्यांच्या संघर्षमय जीवनात, क्रांतिपर्वात माफी मागण्याशिवाय दुसरे काहीच केले नाही असे काही लोकांना वाटते. ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी अंगावर एक चरोटाही मारून घेतला नाही, असे लोक सावरकरांचा उल्लेख माफीवीर म्हणून करत आहेत. सावरकरांसारख्या क्रांतिकारकांनी ब्रिटिश साम्राज्यशाहीविरोधात क्रांतिकारकांची एक फौजच निर्माण केली. एकोणीसशे ऐंशीच्या सुमारास हिंदुस्थानातील काही मान्यवर फ्रान्सच्या दौऱ्यावर गेले होते. तेथील राष्ट्रीय स्मारके व संग्रहालये पाहत असताना फ्रेंच अधिकाऱ्यांबरोबर गप्पा होत होत्या. गप्पांचा ओघ हिंदुस्थानचा स्वातंत्र्य लढा व वीर सावरकरांच्या क्रांतीकार्याकडे वळला. तेव्हा एक फ्रेंच अभ्यासक अधिकारी म्हणाला की, ‘सावरकर फ्रान्समध्ये जन्माला आले असते व तुमच्या स्वातंत्र्यलढ्याप्रमाणे फ्रान्सने संघर्ष केला असता तर सावरकरांना स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्याच फटक्यात देशाचे राष्ट्राध्यक्ष केले असते.’ सावरकरांविषयीचा हा आदर जगभरातील इतिहासकारांना आहेच. त्यांनी सावरकरांचा त्याग, शौर्य व क्रांतिकार्य पाहिले. ते माफीपत्राची चिटोरी चिवडत बसले नाहीत.

अंधाऱ्या गुहेत सावरकरांना दोन जन्मठेपेच्या शिक्षा झाल्या. ते काळेपाणीच होते. सावरकरांनी या शिक्षा पूर्ण भोगल्या असत्या तर त्यांची सुटका पन्नास वर्षे पूर्ण झाल्यावर म्हणजे 23 डिसेंबर 1960 रोजी झाली असती. अंदमानच्या अंधाऱ्या गुहेत खितपत पडत मरण्यापेक्षा ‘युक्ती’ने बाहेर पडावे व देशाच्या सेवेत मग्न व्हावे, हा विचार सावरकरांनी केला. 4 जुलै 1911 रोजी सावरकर अंदमानमधील सेल्युलर जेलमध्ये दाखल झाले. 30 ऑगस्टला त्यांना सहा महिन्यांसाठी एकांतवासात ठेवण्यात आले.

त्यांना सहा महिन्यासाठी एकातवासात ठेवण्यात आले. (आजचे अंडा सेल.) याच काळात सावरकरांनी जेल प्रशासनाकडे विनंतीअर्ज करण्यास सुरुवात केली. असे अर्ज करणे हा जगभरातील कोणत्याही कैद्याचा अधिकारच असतो. सावरकरांना हातकड्या, पायबेड्या घातलेल्या असत. त्याच अवस्थेत त्यांना दोरखंड वळण्याचे काम दिले जात असे. सावरकरांना जेलमध्ये कोणत्याही खास सवलती नव्हत्या. श्री. य. दि. फडके हे एक तटस्थ विश्लेषक व इतिहास संशोधक आहेत. ‘सावरकरांचा शोध’ हा ग्रंथ त्यांनी लिहिला. फडके यांच्या सदसद्विवेकबुद्धीवर तरी सावरकरविरोधकांनी भरवसा ठेवायला हवा.

श्री. फडके सांगतात, “आपण आधी नाशिकमध्ये व नंतर लंडनमध्ये केलेल्या सशस्त्र क्रांतीच्या प्रयत्नाबद्दल कारावासात तात्यांनी फेरविचार केला आणि त्यामुळे सरकारकडे त्यांनी क्षमायाचनावजा पत्रे पाठविली असा काहींचा समज झालेला दिसतो. 1958 साली मुंबई सरकारने भारतीय स्वातंत्र्येतिहासाच्या साधनांचा दुसरा खंड प्रसिद्ध केला. त्यात तात्यांनी 30 मार्च 1920 रोजी अंदमान-निकोबार बेटांच्या मुख्य आयुक्तांना पाठवलेला अर्ज प्रसिद्ध केलेला आहे. या अर्जात निष्ठापूर्वक सरकारशी सहकार्य करण्याची भाषा त्यांनी वापरली आहे हे खरे; पण ती भाषा शब्दशः खरी धरता कामा नये. तात्यांनी वेळोवेळी केलेले अर्ज, त्यामागचा त्यावेळचा राजकीय संदर्भ तसेच इंग्रज राज्यकर्त्यांनी त्यासंबंधी व्यक्त केलेली प्रतिक्रियासमग्र लक्षात घेतली तर तुरुंगातून सुटण्यासाठी तात्या एक चाल खेळत होते हे लक्षात येते. पन्नास वर्षे अंदमानच्या अंधेरीत कुजत राहून जीवितयात्रा संपवण्यापेक्षा परिस्थितीशी जुळवून घेऊन सशर्त किंवा बिनशर्त मुक्त होण्यासाठी ते अंदमानातून प्रयत्न करीत होते. म्हणूनच सुटकेला उपकारक अशी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे असे वाटले की सुटकेसाठी ते अर्ज करीत असत. या व्यावहारिक धोरणाला यश यावे म्हणून ते सरकारला अनेक आश्वासने देत असत आणि सहकार्याचे आमिष दाखवीत असत. 1937 पर्यंत ते हा खेळ खेळत होते.”

राजकीय खेळी

दुसरा महत्त्वाचा संदर्भ येथे द्यायला हवा तो म्हणजे त्याच वेळी बॅ. जमनादास माधवजी मेहता यांच्या अध्यक्षतेखाली सावरकर मुक्तता समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या वतीने एक इंग्रजी पुस्तिका प्रसिद्ध झाली. सरकार अंदमानात सावरकरांचा छळ करीत असल्याचे वृत्तपत्रांतूनही प्रसिद्ध झाले. 1923 सालच्या महाराष्ट्र प्रांतिक परिषदेने तसेच मुंबईत विठ्ठलभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या सभेने सावरकरांची सुटका व्हावी यासाठी ठराव केले. त्याच वर्षाच्या अखेरीस कोकोनाड येथे भरलेल्या काँग्रेसच्या वार्षिक अधिवेशनातही सावरकरांच्या सुटकेसाठी ठराव मंजूर केला.

सावरकरांना कठोर अटी-शर्तीवर मुक्त करावे. त्यांना मुक्तपणे हालचाली करता येऊ नयेत, असा विचार 1923 च्या सप्टेंबरखेरीस होऊ लागला. त्या वेळचे गृह खात्याचे अधिकारी जे. ए. शिलीडी हे सावरकरांच्या सुटकेबाबत सकारात्मक होते. पण सावरकर सरकारबरोबर सहकार्य करण्यास तयार आहेत याच कारणास्तव त्यांची सुटका करण्याचा विचार असेल तर तो बरोबर नाही, असे शिलीडी यांचे मत होते. सावरकर हे डावपेच करीत आहेत. ते सरकारशी सहकार्य करतील ही आशा बाळगणे व्यर्थ ठरेल, असे शिलीडी यांचे म्हणणे होते. क्रांतिकारक काहीही नवे शिकत नाहीत आणि ते कधीही बदलत नाहीत, असा शिलीडी यांनी 28 सप्टेंबर 1923 रोजी अभिप्राय दिलेला आठवतो, हे फडके यांनी पुराव्यासह म्हटले आहे. आता ज्यास माफीनामा वगैरे म्हटले जात आहे त्यात सावरकरांनी काय म्हटले आहे ते पहा.

27 डिसेंबर 1923 रोजी सहीनिशी केलेल्या या निवेदनात तात्यांनी म्हटले, “माझ्यावर योग्य तऱ्हेने खटला भरला गेला आणि मला दिलेली शिक्षाही न्याय्य होती हे मला मान्य आहे. पूर्वायुष्यात अवलंबिलेल्या हिंसक मार्गाचा मी मनापासून निषेध करतो. माझ्या शक्तीनुसार प्रचलित कायदा व राज्यघटना उचलून धरणे हे माझे कर्तव्य आहे असे मला वाटते. भविष्यकाळात मला कार्य करण्याची मुभा देण्यात आली तर नव्या सुधारणा यशस्वी करण्यासाठी आवश्यक ते सारे करण्यास मी तयार आहे. सरकारने मला नाशिकला राहू द्यावे अशी माझी विनंती आहे.”

अर्थातच नाशिकला राहण्यासंबंधीची विनंती नाकारण्यात आली. नाशिक हा तात्यांचा बालेकिल्ला होता. त्यांचे अनेक मित्र व सहकारी तेथे होते. अनेक वर्षांनंतर सुटलेल्या सावरकरांना नाशिकला राहू दिले तर त्या साऱ्यांना संघटित करून तात्या पुन्हा जुने उद्योग सुरू करतील अशी इंग्रज सरकारला रास्त भीती वाटत होती. रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीत राहू आणि प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने राजकारणात भाग घेणार नाही, या दोन अटी तात्यांनी कबूल केल्यामुळे त्यांची सशर्त सुटका करण्यात येत असल्याचे माँटगोमेरी यांनी डॉ. नारायणराव सावरकरांना पत्र लिहून कळवले. आता हे निवेदन म्हणजे माफीनामा आहे की राजकीय खेळी, हे फक्त शहाण्यांनाच समजू शकेल!

नायकावर चिखलफेक

पारतंत्र्यात सावरकर हे सगळय़ांचे नायक होते. स्वातंत्र्यानंतर त्यांना खलनायक ठरवण्याचा प्रयत्न सुरू झाला तो आजही सुरूच आहे. आजही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातही सावरकर या देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत. सावरकरांविषयी द्वेष आणि विष पसरवूनही ते लोकांच्या मनावर अढळपणे विराजमान आहेत. इतिहासात, भविष्यात सावरकरांचे स्थान ‘नायक’ म्हणून राहू नये यासाठी एक विशिष्ट वर्ग सतत ‘माफीवीर’ म्हणून त्यांना हिणवत आला आहे. तरीही अंदमानातील त्यांची अंधारकोठडी ही जगातल्या शूरवीरांसाठी सतत प्रेरणाच देत राहील. सशर्त सुटकेसाठी सावरकरांनी केलेले निवेदन म्हणजे माफीनामा नाही. सावरकर ही एक केवळ व्यक्ती नव्हती तर स्फूर्ती होती. एक मशाल होती. सावरकर म्हणजे एक इतिहासातील ज्वलंत कालखंडच आहे. कान्हेरे, जॅक्सन, मदनलाल धिंग्रा, अभिनव भारत, परदेशी कापडांच्या होळ्या, परदेशातून क्रांतिकारकांना पाठवलेली 28 ब्राऊनिंग पिस्तुले, ‘मोरिया’ बोटीवरून सागरात झोकलेली उडी, हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयातला खटला, अंदमानचा काळा तुरुंगवास असे जीवन त्यांनी भोगले. क्रांतिकारक म्हणून सावरकरांच्या नावावर अनेक विक्रम जमा आहेत; पण मी सगळ्यात जास्त मानतो तो विक्रम म्हणजे सावरकर हे परतंत्र हिंदुस्थानातील एकमेव अशी व्यक्ती आहे की, ज्यांना आपल्या क्रांतिकारक विचारांसाठी ‘बॅरिस्टर’ पदवी गमवावी लागली. तसे म्हटले तर सावरकर व त्यांच्या दोन्ही भावंडांनी सर्वस्वच गमावले. अंदमानातून सुटल्यावर अखेरपर्यंत त्यांच्यापाशी तसे कोणतेच साधन नव्हते. त्यांच्यासारखा विद्वान हा जगण्यासाठी परावलंबीच राहिला. स्वातंत्र्यवीर ही पदवी त्यांना लोकांनी दिली. त्यांच्या विचारांचे सरकार आज सत्तेवर आहे ते त्यांना ‘भारतरत्न’ द्यायलाही तयार नाही!

सावरकरांच्या द्वेषातून एक नपुंसक पिढी पोसली गेली. त्याउलट सावरकरांच्या प्रेरणेतून अनेक लढवय्ये निर्माण झाले. सावरकरांना सातत्याने खलनायक ठरविण्याचे प्रयत्न झाले तरी प्रखर हिंदुत्ववादी, राष्ट्रभक्तांसाठी ते ‘नायक’च आहेत. गांधीजींच्या विरोधात सावरकरांना उभे करून विषाचे प्रवाह निर्माण केले गेले, पण हा विचारांचा झगडा होता. आज काही लोक महात्मा गांधींना मानायला तयार नाहीत. गांधींच्या तुलनेत सरदार पटेल उंच, महान असल्याचे दाखवून नवे राजकारण करीत आहेत. सावरकरांनाही त्याच मार्गावरून जावे लागले.

संबंधित बातम्या :

VIDEO: सावरकरांना भारतरत्न कधी देणार?; संजय राऊतांचा आता थेट मोहन भागवतांनाच सवाल

‘ते’ महात्मा गांधींना हटवून सावरकरांना राष्ट्रपिताही बनवतील; ओवेसींचा राजनाथ सिंहांना टोला

Non Stop LIVE Update
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.