शेतकऱ्यांनी थकबाकी भरल्यास 50 टक्के वीजबिल माफी, ठाकरे सरकारचा निर्णय

राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आज पार पडली. त्यानंतर हे निर्णय जाहीर करण्यात आले आहेत.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 19:07 PM, 19 Nov 2020
शेतकऱ्यांनी थकबाकी भरल्यास 50 टक्के वीजबिल माफी, ठाकरे सरकारचा निर्णय

मुंबईः कृषी पंपाच्या वीजबिलाच्या थकबाकीची रक्कम भरली तर शेतकर्‍यांना 50 टक्के वीजबिल माफी मिळणार, असा निर्णय ठाकरेंच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आज पार पडली. त्यानंतर हे निर्णय जाहीर करण्यात आले आहेत. (Thackeray Government’s Decision To Waive 50 Percent Electricity Bill If Farmers Pay Arrears)

ऊर्जा विभागातील शेती विषयक धोरणं मांडण्यात आली. आज शेतकऱ्यांना नवीन वीज कनेक्शनबाबत निर्णय घेण्यात आला. ग्रामीण भागात शेती पंपाची बिकट अवस्था आहे. आता 66 टक्के निधी त्यासाठी वापरण्यात येईल. 40 हजार कोटींची थकबाकी होती, त्याबाबत निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांची मागील 5 वर्षांची थकबाकी होती, त्याचे डीले चार्जेस माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय ऊर्जा विभागाने घेतला आहे.

ठाकरे सरकारचे महत्त्वाचे निर्णय

– 2018 नंतर कृषी पंपांना वीज कनेक्शन देता येत नव्हते
– आता नवे धोरण आणले आहे, त्यानुसार कृषी पंपांना वीज कनेक्शन देता येईल
– शेतकर्‍यांकडे 40 हजार कोटींची थकबाकी आहे
– त्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे
– मागील पाच वर्षांतील डिले चार्जेस रद्द केले जाणार आहेत
– थकबाकीची रक्कम शेतकर्‍यांनी भरली तर 50 टक्के वीजबिल माफी मिळणार आहे
– दरवर्षी लाख भर शेतकरी कृषी पंप कनेक्शनसाठी अर्ज करतात
– 2 लाखांच्या वर कृषी कनेक्शन द्यायचे आहेत ते दिले जातील

मनसेचा सोमवारपर्यंत अल्टिमेटम
वीजबिल माफी देता येणार नसल्याचं राज्य सरकारनं स्पष्ट केल्यानंतर मनसेने वीजबिल माफीच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. वीजबिलात माफी देण्याच्या मुद्द्यावरून राज्य सरकारने राज्यातील साडे अकरा कोटी जनतेचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे जनतेत संतापाची भावना असून सोमवारपर्यंत बील माफ करा, अन्यथा राज्यात जिल्ह्या जिल्ह्यात जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिला.

भाजपची साथ
वीजबिलाबाबतच्या भूमिकेबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं मनापासून अभिनंदन (Chandrashekhar Bawankule Reaction On Raj Thackeray). भाजप सुद्धा त्यांच्यासोबत या आंदोलनात असेल, अशी मोठी घोषणा भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

वीजबिल भरावेच लागेल : ऊर्जामंत्री
लॉकडाऊनच्या काळातील विजेची बिलं (electricity bill) माफ केली जाणार नाहीत, असे सांगत उर्जामंत्री नितीन राऊत यांनी सामान्यांना शॉक दिला. लॉकडाऊन काळातील वीजबिले माफ होणार नाही किंबहुना वाढीव वीज बिलातून सवलत देणे अशक्य असल्याचं उर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटलं. लोकांनी वीज‌ वापरली त्याचे बिल भरावे, कुठलीही वीजबिल माफी (Electricity Bill) मिळणार नाही, असं ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) म्हणाले.

संबंधित बातम्या:

Electricity Bill: अर्ज, विनवण्या, बैठका सगळं झालं, आता साहेबांच्या आदेशाने रस्त्यावर उतरुन संघर्ष; मनसे नेत्याचे सूचक ट्विट

‘राज ठाकरे मुख्यमंत्र्यांकडे न जाता राज्यपालांना भेटायला का गेले हे संजय राऊतांना आता कळाले असेल’

(Thackeray Government’s Decision To Waive 50 Percent Electricity Bill If Farmers Pay Arrears)