…म्हणून स्वतःची वीजबिले भरणाऱ्या भाजप आमदारांचे आभार, नितीन राऊतांचा टोला

वीजबिले योग्य आहेत म्हणून स्वतःची वीजबिले भरणाऱ्या भाजप आमदारांचे आभार (nitin raut electricity bill)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:45 PM, 24 Nov 2020

मुंबईः वीजबिले योग्य आहेत म्हणून स्वतःची वीजबिले भरणाऱ्या भाजप आमदारांचे आभार, असं म्हणत ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी भाजपला टोला लगावला. आपल्याप्रमाणे जनतेला ज्यांना वीजबिल भरायची आहेत, त्यांना ती भरू द्या! आधीच तुम्ही थकबाकीचा डोंगर करून ठेवलाय तो थोडा हलका होऊ द्या, असं म्हणत त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. (Thank You BJP MLAs For Paying Their Own Electricity Bills, Says Nitin Raut)

ट्विट करत ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊतांनी भाजपवर निशाणा साधला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी वाढीव वीजबिलावरूनही ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला होता. 28 हजार कोटी रुपये केंद्र सरकारचं देणं आहे. केंद्रानं ते पैसे दिल्यास आम्ही कधीही वीजबिल माफी करायला तयार आहोत. भाजपनं जीएसटी थकबाकीच्या वसुलीसाठी आंदोलन केलं पाहिजे. हे म्हणतात आम्ही चौकीदार आहोत. हे कसले चौकीदार हे तर जीएसटीचे थकबाकीदार आहेत, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही, असं म्हणत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला होता.

भाजप नेत्यांनी वीजबिलं घेऊन माझ्या कार्यालयात यावं, सर्वांची मी तपासणी करून देईन, जर वाढीव वीजबिलं नसतील, तर त्यांनी प्रॉमिस करावं, आम्ही सर्व वीजबिलं भरू, असं आव्हानच ऊर्जामंत्र्यांनी भाजपला दिलं होतं. (Thank You BJP MLAs For Paying Their Own Electricity Bills, Says Nitin Raut)

मीटर रीडिंगप्रमाणे जी वीजबिलं आली आहेत, ती भरली गेलीच पाहिजेत. महाविकास आघाडीचं हे गरिबांचं सरकार आहे, शेतकऱ्यांचं सरकार आहे, जनतेनं निवडून दिलेलं सरकार आहे. मागच्या सरकारनं कर्जाचा डोंगर उभा करून ठेवलेला आहे. त्यामुळे आजची परिस्थिती वीजबिल माफीसारखी नाही. भाजपचं हे पाप आहे, असा हल्लाबोलही त्यांनी केला होता.

(Thank You BJP MLAs For Paying Their Own Electricity Bills, Says Nitin Raut)

संबंधित बातम्या:

वीज ग्राहक आमचा देव; त्यांचे आम्ही नुकसान करणार नाही : नितीन राऊत

‘महावितरणचे 67 हजार कोटी रुपये भाजप सरकारच्या काळातच थकीत’, जयंत पाटलांचा भाजपवर पलटवार