‘अब की बार, घराणेशाहीवर वार’, पवार, गांधी, यादव कुटुंबाला धक्का

'अब की बार, घराणेशाहीवर वार', पवार, गांधी, यादव कुटुंबाला धक्का

मुंबई : गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या लाटेत गांधी, यादव आणि पवार कुटुंबियांनी आपला गड राखून ठेवला होता. पण 2019 च्या लोकसभा निवडणुकीत देशातील बड्या नेत्यांना मोठा झटका लागला आहे. निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या आकड्यांनुसार यूपीमधील अमेठी लोकसभा सीटवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना भाजपच्या स्मृती ईरानी या सलग पिछाडीवर टाकत आहे. यासोबतच यादव परिवाराचे तीन सदस्य डिंपल यादव, अक्षय यादव आणि धर्मेंद्र यादवही आपल्या मतदारसंघात पिछाडीवर आहेत. तसेच शरद पवार यांनाही या निवडणुकीत पराभवाची झळ सोसावी लागली आहे. पवारांचा नातू पार्थ पवार यांचाही मावळ मतदारसंघात दारुण पराभव झालेला आहे.

अमेठीमध्ये गेल्यावेळी स्मृती ईरानीने राहुल गांधींना कडवी लढत दिली होती. त्यावेळी त्यांनी 1.7 लाखांच्या फरकाने ईरानी यांना पराभव पत्कारावा लागला होता. यंदा मात्र स्मृती ईरानी यांनी सुरुवातीपासूनच राहुल गांधीवर सतत आघाडी घेतली. 2014 मध्ये मोदी लाट असतानाही यादव कुटंबाने आपल्या बालेकिल्ल्यात विजय मिळवला होता. तसेच शरद पवारांची मुलगी सुप्रिया सुळे यांनीही 2014 मध्ये मोदी लाटेत आपल्या बालेकिल्ल्यात भरघोस मतांनी विजय मिळवला होता. मात्र यंदा देशातील या बड्या नेत्यांच्या घराला दारुण पराभव पत्कारावा लागला आहे.

या लोकसभा निकाला दरम्यान, शरद पवार यांनाही यंदा लोकसभेत मोठा फटका मिळालेला आहे. यंदाच्या निवडणुकीत त्यांची मुलगी सुप्रिया सुळे यांचा जरी विजय झाला असला, तरी पवार कुटुंबियांना पराभवाची झळ सोसावी लागली आहे. शरद पवार यांचा नातू आणि अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांचा मावळ मतदारसंघातून पराभव झालेला आहे. मावळ मतदारसंघात पार्थ पवार यांच्या विरुद्ध शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे होते.

राहुल गांधी यांना उत्तरप्रदेशातील अमेठी मतदारसंघातून पराभव पत्कारावा लागला आहे. हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता. या मतदारसंघात संजय गांधी, राजीव गांधी यांनी निवडणूक लढवल्या आहेत. पण असे असतानाही यंदा राहुल गांधी यांचा अमेठीमध्ये पराभव झालेला आहे.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI