झहीर खान, मकरंद अनासपुरे, इंदोरीकरांना आमदार करा, 12 धडाकेबाज नावं घेऊन सदाभाऊ राज्यपालांच्या भेटीला

राज्यपालांची भेट घेत सदाभाऊ खोतांनी राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची यादी दिली आहे. (Sadabhau khot Governor)

  • समीर भिसे, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 13:48 PM, 25 Nov 2020
Sadabhau khot Governor

मुंबईः रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी आज राज्यपालांची भेट घेतली आहे. राज्यपालांची भेट घेत सदाभाऊ खोतांनी राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची यादी दिली आहे. रयत क्रांती संघटनेकडून राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची नावे सुचवण्यात आलेली असून, तसे पत्र राज्यपालांना दिल्याचंही सदाभाऊ खोतांनी सांगितलं आहे. (The Names Of 12 Members Appointed By The Governor Have Been Suggested By Sadabhau khot)

राज्यपालांच्या भेटीनंतर सदाभाऊ खोतांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला आहे. मकरंद अनासपुरे, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. तात्याराव लहाने, निवृत्ती महाराज इंदोरीकर, क्रिकेटर झहीर खान, अमर हबीब, पोपटराव पवार, विठ्ठल वाघ, विश्वास पाटील, सत्यपाल महाराज, बुधाजीराव मुळीक, मंगलाताई बनसोडे यांची नावं सदाभाऊ खोतांकडून राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी सुचवण्यात आली आहेत. सदाभाऊ खोतांनी राज्यपालांची भेट घेऊन ही नावं सुचवल्यानं महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ उडाली आहे.

तसेच त्यांनी राज्यपालांकडे इतरही मागण्या केल्या आहेत. वाढीव वीजबील माफी द्यावी, ओला दुष्काळ आणि अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांना आर्थिक मदत द्यावी, कोविडमध्ये अत्यावश्यक सेवेदरम्यान मृत पावलेल्या कर्मचा-यांच्या कुटुंबांना 50 लाखांची मदत करावी, अशा आशयाच्या मागण्या त्यांनी केल्या आहेत.
मुख्यमंत्री आम्ही आंदोलन केलं तर कोविडचं कारण दाखवून त्यावर नाराजी व्यक्त करतात. पंतप्रधानांकडे तक्रार करतात. पण आम्ही झपाटलेला या सिनेमातला बाहुला पाहिलाय. त्याच बाहुल्यासारखं मुख्यमंत्री सारखा सारखा कोरोनाचा बाहुला पुढे करतात, असा टोलाही सदाभाऊ खोतांनी लगावला आहे.(The Names Of 12 Members Appointed By The Governor Have Been Suggested By Sadabhau khot)

महाविकास आघाडी सरकारकडून 15 दिवसांच्या मुदतीची शिफारस

दुसरीकडे  राज्यपाल नियुक्त 12 जागांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, गेल्या काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडी सरकारकडून राज्यपालांकडे 15 दिवसांच्या मुदतीची शिफारस करण्यात आली होती. राज्यपालांकडे नावं देतानाच ठाकरे सरकारकडून मुदतीची शिफारस मागण्यात आलेली होती. अद्याप राज्यपालांकडून निर्णयासंबंधी कोणत्याही हालचाली नाहीत.

21 तारखेपर्यंत नावावर निर्णय घेण्याची शिफारस ठाकरे सरकारकडून करण्यात आली असून, अद्यापही राज्यपालांनी त्यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. 6 नोव्हेंबरला महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांकडून राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी देण्यात आली होती. 15 दिवसांत राज्यपालांनी दिलेल्या यादीतील नावं जाहीर करावीत, अशी शिफारस ठाकरे सरकारकडून करण्यात आलेली होती. महाविकास आघाडी सरकारने मुदतीची शिफारस करून राज्यपालांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. पण अद्यापही राज्यपालांनी राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नावावर कोणताही निर्णय घेतलेला नाही.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शुक्रवारी (6 नोव्हेंबर) संध्याकाळी राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या नावाची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सादर केली होती. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब केल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ही यादी राज्यपालांकडे सुपूर्द केली होती. त्यानंतर एवढे दिवस उलटून गेले तरीही राज्यपालांनी अद्याप यादीतील नावे जाहीर केलेली नाहीत.


(The Names Of 12 Members Appointed By The Governor Have Been Suggested By Sadabhau khot)

संबंधित बातम्या:

राज्यपाल नियुक्त 12 जागांचा तिढा वाढला, ठाकरे सरकारकडून 15 दिवसांच्या मुदतीची शिफारस

‘कोश्यारी यांनी विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादी जाहीर करावी’, एकनाथ शिंदेंचं आवाहन