…म्हणून सरकारला कुठलाही धोका नाही; अजित पवारांचा भाजपवर पलटवार

आता जाणार, आता जाणार म्हणत होते, पण महाविकास आघाडीच्या सरकारला वर्ष झालं की नाही.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 9:20 AM, 25 Nov 2020

कराडः सरकार पडणार आहे हे विरोधी पक्षांना सतत म्हणावंच लागतं. 1995 ते 99 च्या काळात आम्ही 80 जण आमदार म्हणून निवडून गेलेले होतो. कार्यकर्तेबरोबर राहण्याकरिता आणि आमदारांमध्ये चलबिचल राहू नये, यासाठी सारखं गाजर दाखवायचं काम करायचं असतं, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर पलटवार केला. यशवंतराव चव्हाणांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार कराडला गेले आहेत. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. (There Is No Threat To The Government; Ajit Pawar Retaliation Against BJP)

आता जाणार, आता जाणार म्हणत होते, पण महाविकास आघाडीच्या सरकारला एक वर्ष झालं की नाही. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधी या तिघांनी मिळून महाविकास आघाडी केलेली आहे. जोपर्यंत त्या तिघांचे महाविकास आघाडीच्या पाठीशी आशीर्वाद आहेत. ते मजबुतीनं उभे आहेत, तोपर्यंत सरकारला काहीही होणार नाही हे मी स्पष्टपणे सांगू शकतो, असंही अजित पवारांनी विरोधकांना ठणकावून सांगितलं आहे.

त्यासंदर्भात शरद पवारांनी काल जयसिंगराव गायकवाडांच्या पक्ष प्रवेशात सरकार पडणार नसल्याची भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्यावर मी जास्त बोलणं योग्य दिसत नाही. शरद पवार आमच्या सर्वांचं दैवत आहे आणि त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे, असंसुद्धा अजित पवार म्हणाले. ते 105 लोकं असताना त्यांना सरकारमध्ये कामाची संधी मिळालेली नाही हे त्यांचं खरं दुखणं आहे. त्यामुळेच सारखं काही ना काही कांड्या पेटवायचं काम त्यांचं सुरू आहे, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे.

ईडीचा वापर कसा करायचा हा केंद्राचा अधिकार- अजित पवार

पत्रकारांनी केंद्र सरकार ईडीचा दुरुपयोग करत असल्याचं विचारलं असता ते म्हणाले, ईडीचा वापर कसा करायचा हा केंद्राचा अधिकार आहे. राज्य सरकार त्यांच्या पद्धतीनं प्रयत्न त्या ठिकाणी करत असते. राज्याच्या संदर्भात काही प्रश्न निर्माण झाल्यास राज्याचा पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. आजपर्यंत आपल्या पोलिसांनी खूप चांगलं काम करून दाखवलेलं आहे. अनेक सरकारच्या काळात पोलिसांनी चांगलं काम केलेलं आहे. पोलिसांनी आता असं का केलं, याची माहिती नाही. माझं प्रताप सरनाईकांशी बोलणं झालेलं नाही. कॅबिनेटमध्ये असताना आम्हाला ही बातमी समजली. त्यानंतर मी कराडला निघून आलो, असंही अजित पवार म्हणाले आहेत.

संबंधित बातम्या

आमदारांनी पक्ष सोडू नये म्हणूनच फडणवीसांना सरकार पडणार हे सांगावं लागतं; जयंत पाटलांचा टोला

महाआघाडीचं सरकार लवकरच पडणार हे शरद पवारही जाणून: निलेश राणे