100 युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा कुठलाच विषय नव्हता; ऊर्जा राज्यमंत्र्यांचा दावा

100 युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा कुठलाच विषय नव्हता, ऊर्जा राज्यमंत्र्यांचा दावा. (Prajakt Tanpure Free Electricity)

100 युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा कुठलाच विषय नव्हता; ऊर्जा राज्यमंत्र्यांचा दावा

अहमदनगरः 100 युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा कुठलाच विषय नव्हता; असा दावा ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनुपरे यांनी केला आहे. ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. (There Was No Question Giving Free Electricity Up To 100 Units; Says Prajakt Tanpure )

राज्यामध्ये तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन ज्या कॉमन मिनिमम प्रोग्रामवर सरकार बनवले, त्यामध्ये शंभर युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा कुठलाच विषय नव्हता, असे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी स्पष्ट केलंय. तसेच यावर एक समिती देखील स्थापन केली आहे. त्याचा निर्णय येणे अद्याप बाकी असल्याचं ही त्यांनी म्हटलंय. गोरगरिबांची तळमळ बघता मंत्री नितीन राऊत यांनी ती इच्छा व्यक्त केली होती. तर एखादा शब्द इकडे तिकडे जाऊ शकतो, असं मत तनपुरे यांनी व्यक्त केलंय.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावर टीकाटिप्पणी सुरू आहे. त्यातच आता पुन्हा एकदा उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी राज्यातील जनतेला पुन्हा आश्वासन दिलं होतं. राज्यातील घरगुती वीजग्राहकांना 100 युनिटपर्यंत वीज माफ करण्याचा विचार अजूनही कायम आहे, असे नितीन राऊत म्हणाले होते. त्यामुळे आता या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकारण रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे. “काही दिवसांपूर्वी मी 100 युनिटपर्यंत वीज माफी करावी असं मला वाटतं, असं मी म्हटलं होतं. त्यासाठी अभ्यासगटाची समिती स्थापन करण्यात आली. मधल्या काळात कोरोना आल्याने या अभ्यासगटाच्या बैठका झाल्या नाहीत. त्यामुळे समितीचा अहवाल आला नाही.”

“आताची महावितरणची आर्थिक स्थिती पाहता 59 हजार कोटींची तफावत आली आहे. मागच्या सरकारनं जे पाप करून ठेवलं आहे. त्याचं निरसन करूनच 100 युनिट वीज माफीचा निर्णय घेण्यात येणार आहे. पण जनतेला 100 युनिट वीज माफी देण्यावर मी ठाम आहे. ही वीज मी माफ केल्याचं तुम्हीही पाहाल,” असंही उर्जामंत्र्यांनी सांगितलं होतं. कृषी पंपांची थकबाकी 40 हजार कोटीपर्यंत आहे. मार्च 2014 अखेर महावितरणाची थकबाकी 14154 कोटी होती. ही थकबाकी 59148 कोटीपर्यंत गेली आहे. त्याची निश्चित चौकशी केली जाईल. याबाबत चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत, असेही नितीन राऊत म्हणाले होते.

संबंधित बातम्या : 

वीज ग्राहक आमचा देव; त्यांचे आम्ही नुकसान करणार नाही : नितीन राऊत

कोणतीही वीज बिलं माफ होणार नाहीत; ऊर्जामंत्र्यांचा सामान्यांना शॉक

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *