मुंबई : महाविकास आघाडी सरकारने या ‘टीआरपी’ घोटाळ्याची चौकशी केली नसती तर या देशाचे हे खरे गुन्हेगार कधीच समोर आले नसते, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपले मत व्यक्त केले. टीआरपी घोटाळ्यानंतर एक तथाकथित पत्रकाराचे संभाषण समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करत आपली तीव्र नाराजी व्यक्त केली. (these real criminals of the country would never have come forward: Jayant Patil)
प्रसारमाध्यमांना लोकशाही व्यवस्थेचा चौथा स्तंभ मानण्यात आलं आहे. मात्र प्रसारमाध्यमांतील एक तथाकथित पत्रकार व्यक्ती देशाच्या पंतप्रधानांचे कार्यालय आणि प्रमुख मंत्रालयांना अक्षरशः खेळण्याप्रमाणे वापरून घेत आहे, हे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या माहितीवरून समजते, असेही जयंत पाटील यांनी म्हटले.
खरे देशद्रोही कोण आहेत हे जनतेला कळेल: जयंत पाटील
सदर व्यक्तीला देशातील सैनिकांचे बलिदान एक ‘विजयाचा’ क्षण वाटतो आहे. प्रसिद्ध झालेली ही सर्व माहिती वाचल्यावर खरे देशद्रोही कोण आहेत हे जनतेला कळेल. सदर इसम अत्यंत बिनधास्तपणे न्यायाधीशांना विकत घेण्याच्या गप्पा मारताना अत्यंत स्पष्टपणे दिसत आहे, न्यायालयाचा खऱ्या अर्थाने अवमान आहे, असा आरोपही जयंत पाटील यांनी केला. अनेक गोपनीय बातम्या देशाच्या संसदेला आणि अगदी देशाच्या मंत्रिमंडळाला अवगत होण्यापूर्वीच या व्यक्तीला माहिती होत्या, असेही जयंत पाटील यांनी ट्विटद्वारे म्हटले.
मुंबई पोलिसांनी 6 ऑक्टोबरला बोगस टीआरपी प्रकरणी एफआयआर नोंदवली होती. मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषद घेत हे प्रकरण उघडकीस आणले होते. या दरम्यान रिपब्लिक टीव्ही सह इतर दोन मराठी चॅनेलच्या नावाचा उल्लेख पोलिसांनी केला होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी काही जणांना अटक केली असून चौकशी सुरू आहे.
बोगस टीआरपी प्रकरणी रिपब्लिक टीव्हीच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी देखील करण्यात आली होती. यानंतर रिपब्लिक टीव्हीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, त्यांना मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यास सांगण्यात आले होते. रिपब्लिक टीव्हीचे वकील हरिश साळवे यांनी हे प्रकरण सीबीआयला सोपवण्याची केलेली मागणी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
संबंधित बातम्या
TRP Scam | रिपब्लिक चॅनलचे सीईओ विकास खानचंदानीला अटक, टीआरपी घोटाळ्यात मुंबई पोलिसांची कारवाई
‘रिपब्लिक टीव्ही’च्या अर्णव गोस्वामी यांना अटक
these real criminals of the country would never have come forward: Jayant Patil