TMC election 2022 : एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात काय होणार? वॉर्ड क्रमांक 28 कुणाचा?

राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ही निवडणूक आणखी अवघड होऊन बसली आहे. गेल्या काही दिवसात अनेक नेत्यांनी ठाकरेंची साठ सोडली आहे. त्यामुळेच असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

TMC election 2022 : एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात काय होणार? वॉर्ड क्रमांक 28 कुणाचा?
TMC election 2022
Image Credit source: tv9
दादासाहेब कारंडे

|

Aug 07, 2022 | 3:51 PM

ठाणे : राज्याच्या राजकारणात सध्या केवळ आणि केवळ महानगरपालिका निवडणुकांची (Maharashtra Municipal Corporation Election 2022) चर्चा आहे. आता महानगरपालिका निवडणुका लागाव्यात आणि ठाणे महानगरपालिका निवडणुकीची चर्चा होणार नाही, असं होणारच नाही. कारण ठाणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांचे घर आहे आणि त्यामुळेच ठाणे महानगरपालिका (TMC election 2022) ही यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या पेक्षाही जास्त चर्चेत आहे. तसेच मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांना मिळणारे ठाण्यातलं समर्थनही वाढलं आहे. त्यांच्यापुढे तगडं आव्हान कुठल्याही राजकीय पक्ष देताना दिसत नाहीये. त्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक सोपी मानले जातेय, तर राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ही निवडणूक आणखी अवघड होऊन बसली आहे. गेल्या काही दिवसात अनेक नेत्यांनी ठाकरेंची साठ सोडली आहे. त्यामुळेच असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

पक्षउमेदवारविजयी
भाजप
शिवसेना
राष्ट्रवादी
काँग्रेस
इतर
मनसे

वॉर्ड क्रमांकची 28 ची आकडेवारी काय सांगते?

आता या वॉर्डच्या आकड्यांच्या समीकरणावर ही एक नजर टाकूया.. आकड्यांची समीकरणे पाहिल्यास या वार्डमध्ये एकूण लोकसंख्या ही 34 हजार 945 आहे यामध्ये 665 अनुसूचित जातीचे मतदार आहेत तर 264 अनुसूचित जमातीचे मतदार आहेत. एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ही संख्या अत्यंत कमी असल्याने निवडणुकीवर याचा फार काही परिणाम पडेल असं वाटत नाही. त्यामुळेच या ठिकाणी जातीय समीकरणाचं टेन्शन असणार नाही. मात्र अंतर्गत कलह ही मोठी डोकेदुखी ठरू शकते. असा अदाजही वर्तवण्यात येत आहे.

पक्षउमेदवारविजयी
भाजप
शिवसेना
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
इतर

ठाकरेंचा निवडणूक जिंकण्याचा प्लॅन काय?

ठाण्यात एका बाजूला राष्ट्रवादीकडून जितेंद्र आव्हाड यांच्यासारखा मोठा नेता आहे. तर दुसरीकडून उद्धव ठाकरे हे ठाणे पुन्हा काबीज करण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहेत. त्यासाठी ते या निवडणुकीत नक्कीच आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांची मदत घेताना दिसून येतील. मात्र ठाणे हे एकनाथ शिंदे यांचे घर असल्याने आणि श्रीकांत शिंदे हे कल्याणचे खासदार असल्याने उद्धव ठाकरे यांचे मनसुबे किती यशस्वी होणार याबद्दल जरा शंकाच आहे.

पक्षउमेदवारविजयी
भाजप
शिवसेना
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
इतर

जुने नेते अजूनही ठाकरेंसोबतच

उद्धव ठाकरे यांच्यासाठी या ठिकाणी एक जमेची बाजू म्हणजे राष्ट्रवादी अजूनही उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहे. तर खासदार राजन विचारांसारखे जुने नेते हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याने त्यांच्यासाठी ही निवडणूक काहीशी सोपी झाली आहे. तर केदार दिघे यांच्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत येण्याने ठाकरे यांना आणखी बळ मिळणार आहे. त्यामुळे या ठिकाणी चांगली चुरस होऊ शकते.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें