सत्य समोर यायलाच हवे; समर्थकांचा सोशल मीडियातून DM ना सपोर्ट

धनंजय मुंडेंनी फेसबुक पोस्ट करत खुलासा केल्यानं अनेक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून धनंजय मुंडेंना पाठिंबा देत आहेत.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 20:15 PM, 14 Jan 2021
Dhananjay Munde

मुंबई: राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याविरोधात एका महिलेनं बलात्काराचा आरोप केल्यानं खळबळ उडालीय. विशेष म्हणजे या आरोपांनंतर धनंजय मुंडेंनी फेसबुक पोस्ट करत खुलासा केल्यानं अनेक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून धनंजय मुंडेंना पाठिंबा देत आहेत. बलात्कारासारख्या गंभीर आरोपातील सत्यता समोर यायला हवी, अशी मागणी त्यांच्या समर्थकांनी केलीय. एखादं नेतृत्व मोठं होत असताना जाणूनबुजून त्याला मागे ओढलं जातं. धनंजय मुंडेंनी वस्तुस्थिती सर्वांसमोर मांडल्यानं अनेक जण त्यांच्या बाजूनंही उभे राहिलेत. सोशल मीडियातूनही वुई सपोर्ट डीएम, आय सपोर्ट धनुभाई अशा प्रतिक्रियासुद्धा नेटकरी देऊ लागलेत. (Truth Must Come Out; Supporters Support DM Through Social Media)

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंनी फेसबुक पोस्ट करत सर्व आरोप फेटाळून लावलेत. तसेच आरोप फेटाळत त्यांनी वस्तुस्थितीही सर्वांसमोर मांडलीय. मोठ्या संघर्षानंतर धनंजय मुंडेंना आमदारकी मिळाली. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली आणि त्यांना मंत्रिपदही मिळालं. आता त्यांचे समर्थक आणि कार्यकर्तेही त्यांच्या बाजूने उभे राहिलेले असून, सोशल मीडियातून त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. धनंजय मुंडेंवर अत्याचाराचे आरोप झाल्यानंतर काही वेळातच फेसबुक पोस्ट करत त्यांनी खुलासा केलाय. वस्तुस्थितीसुद्धा लोकांसमोर जाहीररीत्या मांडलीय. धनंजय मुंडेंचे समर्थक आणि कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी उभे आहेत.

शरद पवार काय भूमिका घेणार?

एकीकडे मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागलेलं असताना, दुसरीकडे धनंजय मुंडे यांचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीही या प्रकरणात ठाम भूमिका घेतलीय. शरद पवार यांचा शब्द हा फक्त राष्ट्रवादीतच नव्हे तर आता महाविकास आघाडीतही प्रमाण मानला जातो. जर शरद पवारांनी कडक भूमिका घेतली तर धनंजय मुंडेंचं मंत्रिपद मुख्यमंत्रीही वाचवू शकणार नाहीत. धनंजय मुंडेंना पायउतार होऊन येईल त्या प्रसंगाला तोंड द्यावं लागेल, जर निर्णय झालाच, तर चौकशीलाही सामोरे जावे लागेल.

धनंजय मुंडे यांची फेसबुक पोस्ट

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी बलात्काराच्या आरोपांनंतर दोन दिवसांपूर्वी फेसबुक पोस्ट लिहून स्पष्टीकरण दिलं होतं. धनंजय मुंडे यांनी बलात्काराच्या आरोपांनंतर फेसबुकवर पोस्ट करून, आरोप करणारी रेणू शर्मा (Renu Sharma) ही करुणा शर्माची (Karuna Sharma) बहीण असल्याचं म्हटलं आहे. महत्त्वाचं म्हणजे “करुणा शर्मा यांच्याशी आपला सहमतीने संबंध होता, त्यांच्यापासून आपल्याला दोन अपत्ये आहेत, त्यांचं पालनपोषण आपणच करत असून, आपल्या कुटुंबाल सर्व माहिती आहे” असं धनंजय मुंडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं होतं.

संबंधित बातम्या   

“कटुतेवर मात करत…” बलात्काराच्या आरोपांनंतर धनंजय मुंडे यांचे आणखी एक ट्विट

….. तर धनंजय मुंडेंचं मंत्रिपद मुख्यमंत्रीही वाचवू शकणार नाहीत

Truth Must Come Out; Supporters Support DM Through Social Media