Maharashtra MLAs In Guwahati : काय ते जॅकेट, काय ती स्टाईल, काय ते विमान, काय ते फोटो, उदय सामंतही मुक्काम पोस्ट गुवाहाटी

मंत्री उदय सामंत हेही आज गुवाटीला पोहोचले आहेत. त्यामुळे शिंदे गटाचं बळ आणखी वाढणार आहे. एकनाथ शिंदे स्वत: उदय सामंत यांना रिसीव्ह करण्यासाठी एअरपोर्टवर आले होते. यानंतर सर्व आमदारांनी हॉटेलवर त्यांचे जंगी स्वागत केले. सर्व आमदारांनी हस्तांदोलन करत त्यांची गळाभेट घेतली.

Maharashtra MLAs In Guwahati : काय ते जॅकेट, काय ती स्टाईल, काय ते विमान, काय ते फोटो, उदय सामंतही मुक्काम पोस्ट गुवाहाटी
Follow us
| Updated on: Jun 26, 2022 | 8:52 PM

मुंबई : गुवाहाटीत मुक्कामी गेलेल्या एकनाथ शिंदेच्या(Eknath shinde) गटाची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे. शिवसेनेचे 50 पेक्षा जास्त आमदार एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले आहेत. शिवसेनेचे मंत्री उदय सामंत(Uday Samant) हे देखील गुवाहाटीत दाखल झाले आहेत. सामंत यांचे काही फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत.एकनाथ शिंदे गटातील आमदार आणि मंत्र्यांची सख्या अजूनही वाढताना पाहायला मिळत आहे. गेल्या तीन, चार दिवसात ठाकरेंच्या सर्व बैठकांना उपस्थित असणारे मंत्री उदय सामंत हेही आज गुवाटीला पोहोचले आहेत. त्यामुळे शिंदे गटाचं बळ आणखी वाढणार आहे. एकनाथ शिंदे स्वत: उदय सामंत यांना रिसीव्ह करण्यासाठी एअरपोर्टवर आले होते. यानंतर सर्व आमदारांनी हॉटेलवर त्यांचे जंगी स्वागत केले. सर्व आमदारांनी हस्तांदोलन करत त्यांची गळाभेट घेतली.

व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये उदय सामंत वेगळ्याच लुक मध्ये दिसत आहेत. त्यांनी टी शर्टवर स्लिव्हलेस जॅकेट घातले आहे. यातील काही फोटो विमानातील देखील आहे.

एकनाथ शिंदे हे मंगळवारी दिवसभर सुरतमध्ये होते. त्यानंतर ते सुरतहून आसामच्या दिशेने निघाले. यांनतर त्यांच्या विमानाने गुवाहाटीमध्ये थांबा घेतला. यानंतर गुवाहाटीतून आमदार फोडाफोडीचे राजकारण सुरु झाले.

आतापर्यंत 40 पेक्षा अधिक आमदार गुवाहाटीतील एकनाथ शिंदेच्या गटात सहभागी झाले आहे. आमदारांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत एकनाथ शिंदे सातत्याने शक्ती प्रदर्शन करत आहेत.

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.