नार्वेकरांच्याच नको, तर राणेंच्या ‘त्या’ बंगल्याचीही पाहणी करा; वैभव नाईकांचं सोमय्यांना आव्हान

शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या दापोलीतील निर्माणाधीन बंगल्यावर हातोडा पडला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या उद्या या कारवाईची पाहणी करण्यासाठी दापोलीला जाणार आहे. (vaibhav naik)

नार्वेकरांच्याच नको, तर राणेंच्या 'त्या' बंगल्याचीही पाहणी करा; वैभव नाईकांचं सोमय्यांना आव्हान
vaibhav naik
Follow us
| Updated on: Aug 22, 2021 | 8:04 PM

रत्नागिरी: शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या दापोलीतील निर्माणाधीन बंगल्यावर हातोडा पडला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या उद्या या कारवाईची पाहणी करण्यासाठी दापोलीला जाणार आहे. त्यावरून शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी सोमय्यांवर टीका केली आहे. सोमय्या यांनी केवळ नार्वेकरांच्या बंगल्यांचीच पाहणी करू नये. तर केंद्रीय सूक्ष्म व लघु उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या बंगल्यांचीही पाहणी करावी, असं आव्हानच वैभव नाईक यांनी सोमय्यांना दिलं आहे. (vaibhav naik open challenge to kirit somaiya over narvekar bungalow)

वैभव नाईक यांनी मीडियाशी संवाद साधताना हे आव्हान दिलं आहे. मिलिंद नार्वेकर यांनी बांधलेल्या बंगल्याचे पडलेले बांधकाम पाहायला येण्याआधी नारायण राणे यांचा जुहूमधील ‘अधीश’ बंगला आणि सिंधुदुर्गात केलेल्या अनधिकृत बांधकामाचीही पाहाणी करावी, असं आव्हानच नाईक यांनी दिलं आहे.

नार्वेकरांनीच पाडलं बांधकाम

दरम्यान, मिलिंद नार्वेकर यांचा मुरुड दापोलीच्या समुद्र किनारी अलिशान बंगला बांधण्यास सुरुवात केली होती. मात्र सीआरझेडच्या नियमांचे उल्लंघन करून हा बंगला बांधण्यात येत असल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यामुळे हा बंगला पाडण्याचे काम आज सकाळपासूनच सुरू करण्यता आले. जेसीबी मशीन लावून हा बंगला तोडण्यात आला आहे. विशेष म्हणजे नार्वेकर यांनी स्वत: हे बांधकाम पाडून घेतलं आहे. किरीट सोमय्या यांनी या तोडक कारवाईचा व्हिडीओ ट्विट करून माहिती दिली आहे. तसेच हा बंगला किती प्रमाणात तोडला याची पाहणी करण्यासाठी सोमय्या स्वत: दापोलीत जाणार आहेत.

पुढचा नंबर परब यांचा

दरम्यान, आज नार्वेकर यांचा बंगला तोडण्यात आला आहे. आता पुढचा नंबर राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्या रिसॉर्टचा असल्याचं सोमय्या यांनी म्हटलं आहे. सोमय्या यांनी तसं ट्विटच केलं आहे. (vaibhav naik open challenge to kirit somaiya over narvekar bungalow)

संबंधित बातम्या:

Video: मिलिंद नार्वेकरांच्या दापोलीतल्या ‘त्या’ बंगल्यावर अखेर जेसीबी, सोमय्या म्हणतात, करुन दाखवलं, पुढचा नंबर कुणाचा?

दापोलीच्या समुद्र किनारी परवानगी न घेता मिलिंद नार्वेकरांचा बंगला, किरीट सोमय्यांचा आरोप

अनिल परबांच्या अडचणी वाढणार? सोमय्यांच्या तक्रारीनंतर केंद्रीय पथकाकडून परबांच्या रिसॉर्टची पाहणी

(vaibhav naik open challenge to kirit somaiya over narvekar bungalow)

Non Stop LIVE Update
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.