“बिनकामी नेते गेल्याने पक्षावर परिणाम नाही, नवीन पदाधिकारी जोमाने कामं करतील”

पक्षाच्या विश्वासहार्तेवर प्रश्न उपस्थित करणे बेईमानीचा नवा अध्याय आहे, असं वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते राजेंद्र पातोडे (vanchit bahujan aaghadi activist resignation) यांनी सांगितले.

बिनकामी नेते गेल्याने पक्षावर परिणाम नाही, नवीन पदाधिकारी जोमाने कामं करतील
Follow us
| Updated on: Feb 23, 2020 | 11:36 AM

मुंबई : पक्षाच्या विश्वासहार्तेवर प्रश्न उपस्थित करणे बेईमानीचा नवा अध्याय आहे, असं वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते राजेंद्र पातोडे (vanchit bahujan aaghadi activist resignation) यांनी सांगितले. माजी आमदार बळीराम सिरस्कार आणि 47 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देत काल (22 फेब्रुवारी) पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय (vanchit bahujan aaghadi activist resignation) घेतला.

राजेंद्र पातोडे म्हणाले, “30 वर्षे सत्ता आणि पदे मिळाली, 10 वर्षे आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत सभापती, लोकसभा उमेदवारी, जिल्हाध्यक्ष पदासहीत सर्व काही मिळविले आणि पक्षाच्या विश्वासाहार्तेवर प्रश्न उपस्थित करणे बेईमानीचा नवा अध्याय आहे.”

“विधानसभा निवडणुकीत आणि जिल्हा परिषद निवडणुकीत उघड उघड पक्षाच्या विरोधात उमेदवार पाडण्यासाठी फिरणाऱ्या दोन्ही माजी आमदारांनी स्वतःची विश्वासाहार्ता तपासली पाहीजे. पक्षाचा विश्वास संपला असता, तर दोन्ही माजी आमदारांची उघड बेईमानी यशस्वी झाली असती. स्वबळावर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सत्ता मिळाली नसती. त्यामुळे पक्षाची नव्हे तर दोन्ही माजी आमदारांची विश्वासाहार्ता संपली आहे”, असंही राजेंद्र पातोडे म्हणाले.

“वंचित आता राज्याबाहेर विविध राज्यात एनआरसी, सीएए आणि एनपीआर विरोधात आंदोलन करत आपल्या कक्षा रुंदावत आहे. पक्षाच्या विरोधात जावून केलेल्या बेईमानीवर जालीम उपाय करण्यासाठी अकोला जिल्ह्यातील वंचितचे कार्यकर्ते सक्षम आहेत. यापूर्वी तसा प्रयत्न करणारे अनेक सुरमा आज राजकीय वनवासात आहेत. दोन्ही माजी आमदारांनी पक्ष सोडला असेल तर पक्षाच्या नावावर मिळालेल्या आमदारकीची पेंशन आणि सवलती देखील स्वाभिमान पूर्वक सोडून दिल्या पाहिजे”, असंही पातोडे यांनी सांगितले.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीतून एकूण 47 जणांनी राजीनामे दिले आहेत. यामध्ये माजी आमदार बळीराम सिरस्कार, हरिदास भदे, राज्याचे महासचिव नवनाथ पडळकर, अर्जुन सलगर यांच्यासह अनेक जिल्हाध्यक्ष, संपर्क प्रमुख, महासचिव, सल्लागारांसह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.