महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे दुःख वेगळे आहे का?; विश्वजित कदम यांचा थेट मोदी सरकारला सवाल

मग महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे दुःख वेगळे आहे का?, असा थेट सवाल कृषी आणि न्याय राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी मोदी सरकारला विचारला आहे.

महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे दुःख वेगळे आहे का?; विश्वजित कदम यांचा थेट मोदी सरकारला सवाल

परभणीः शासनाकडे पैसे नसताना आणि केंद्र सरकार जीएसटीचे पैसे देत नसताना सरकार 10 हजार कोटी रुपयांची मदत देत आहे. सदर मदत महिन्याभरात शासन शेतकऱ्यांना देईल. बिहार राज्यात निवडणुका आहेत. त्यामुळे केंद्र सरकार त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करते. मग महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे दुःख वेगळे आहे का?, असा थेट सवाल कृषी आणि न्याय राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी मोदी सरकारला विचारला आहे. (Vishwajit Kadam On Modi Government)

राज्याचे कृषी व न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम हे परभणी जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यांनी कोरोना आणि परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीच्या बाबतीत आढावा बैठक घेतली. राज्यातील शेतकऱ्यांचं परतीच्या पावसाने मोठं नुकसान झालं असून, शेतकरी अडचणीत असताना शेतकऱ्याच्या सोबत आहे. या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे केंद्र सरकार का दुर्लक्ष करते?, असा सवाल मंत्री कदम यांनी केंद्र सरकारला केला.

त्याच बरोबर राज्यातील भाजपच्या नेत्यांनी यासाठी पाठपुरावा करून केंद्र सरकारने याचं आत्मपरीक्षण करावं, असं म्हटलं आहे. उद्धवजींनी शरद पवार यांच्याकडेच सगळे अधिकार सोपवले असल्याची टीका चंद्रकांत पाटलांनी केली होती. त्याचाही त्याचाही त्यांनी खरपूस समाचार घेतला आहे. राज ठाकरे हे शरद पवार यांची भेट घेणार आहेत का? या प्रश्नाला उत्तर देताना चंद्रकांत पाटलांनी ठाकरे सरकारवर केली होती. त्यावर पत्रकारांनी कदम यांना विचारलं असता, चंद्रकांतदादांना फारसं गांभीर्याने घ्यायची मला गरज वाटत नाही. कारण महाविकास आघाडी सरकार आणि तीन ही पक्ष चांगलं काम करीत आहेत. आम्ही सत्तेवर आल्याबरोबर 98 टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. आम्ही सर्वच्या गटाच्या हिताचे निर्णय घेत असून, आमचं सगळं काही सुरळीत चालू असल्याचा दावा ही विश्वजित कदम यांनी यावेळी व्यक्त केलाय.

संबंधित महत्त्वाच्या बातम्या

शेतकरी-कामगार विरोधी कायद्यांना विरोध, 26 नोव्हेंबरला शेकापकडून भारत बंदची हाक

मुख्यमंत्र्यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करणारा रायगडचा शेतकरी ‘मातोश्री’बाहेर सहकुटुंब उपोषणाला

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *