VIDEO| अरुण राठोडला आम्ही ओळखत नाही, पूजाच्या आईचा धक्कादायक खुलासा

ती खूप टेन्शनमध्ये होती, तिने आत्महत्या का केली याबद्दल काहीच माहीत नाही, असंही मंडूबाई चव्हाण म्हणाल्यात.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:46 PM, 26 Feb 2021
VIDEO| अरुण राठोडला आम्ही ओळखत नाही, पूजाच्या आईचा धक्कादायक खुलासा
Pooja Chavan Mother

बीडः टिकटॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नवनवे खुलासे समोर येत आहेत. आता पूजाची आई आणि बहिणीनं टीव्ही 9 मराठीकडे मोठे गौप्यस्फोट केलेत. आमची बदनामी थांबवा नाहीतर आम्ही आत्महत्या करू, असंही पूजाची आई मंडूबाई चव्हाण म्हणाल्या आहेत. पूजाच्या आई आणि बहिणीनं टीव्ही 9 मराठीशी बातचीत केलीय. त्यावेळी त्यांनी धक्कादायक माहिती सर्वांसमोर आणलीय. माझ्या मुलीचा मृत्यू झालाय, तिची बदनामी करू नये, माझी मुलगी कशी होती मला माहीत आहे. ती खूप टेन्शनमध्ये होती, तिने आत्महत्या का केली याबद्दल काहीच माहीत नाही, असंही मंडूबाई चव्हाण म्हणाल्यात. (We Don’t Know Arun Rathod, The Shocking Revelation Of Pooja Chavan Mother)

अरुण राठोडला आम्ही ओळखत नाही; पूजाच्या आईचा खुलासा

मला आणखी पाच मुली आहेत, आम्ही सगळेच आत्महत्या करणार आहोत. पूजाने आम्हाला काहीच सांगितलं नाही. दोन ते चार दिवसांत येते आणि भेटून जाते, असं तिने सांगितलं. बाकी काहीच बोलली नाही, असा खुलासाही पूजाच्या आईनं केलाय. अरुण राठोडला आम्ही ओळखत नाही. फक्त नावच ऐकलं आहे. ती आमच्यासाठी मुलासारखीच होती. सर्व तिला राखी बांधत होते. सर्वांची काळजी घ्या असं ती नेहमी सांगायची. आम्हाला काहीच माहीत नाही, उगाच काही तरी बदनामी करायची, त्यांना काही मुलीबाळी नाहीत काय?, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.

आमची बदनामी थांबवा नाहीतर आम्ही आत्महत्या करू, पूजाची आई उद्विग्न

आमची बदनामी थांबवा नाहीतर आम्ही आत्महत्या करू, असंही पूजाची आई म्हणाली आहेत. माझी मुलगी धाडसी होती. तिची हत्या आहे की आत्महत्या याबद्दल काहीच सांगता येत नाहीये, असं म्हणत मंडूबाईंनी बोलण्यास नकार दिलाय. अरुणला फक्त एकदा पूजासोबत पाहिले होते. माझी बहीण वाघीण होती, ती आत्महत्या करणाऱ्यांपैकी नाही. ती प्रीतम मुंडे आणि पंकजाताई मुंडेंसोबतही फिरलेली आहे. माझी बहीण कार्यकर्ती होती हे अख्ख्या बीडला माहीत आहे, तिचं कोणासोबत नाव जोडणं योग्य नाही, असंही पूजा चव्हाणची बहीण म्हणाली आहे.

दोन्ही अरुण राठोड एकच आहेत का?

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अरुण राठोडचं नाव आलं आहे. हा अरुण राठोड बीडचा असून वन मंत्री संजय राठोड यांचा कार्यकर्ता असल्याचं सांगण्यात येत आहे. तर यवतमाळमधील अरुण राठोड याचा पत्ता शिवाजी नगर, नांदेड असा दाखवण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही प्रकरणातील अरुण राठोड एकच आहेत की दोन्ही वेगळे आहेत? असा सवाल निर्माण झाला आहे.

‘त्या’ व्हायरल क्लिपमध्ये काय संभाषण झालं होतं?

पूजा चव्हाणने आत्महत्या केल्यानंतर एकूण 12 ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या. त्यात अरुण चव्हाण आणि कथित मंत्र्याचं कथित संभाषण होतं. त्यात पूजाच्या उपचाराबाबत दोघांनीही चर्चा केली होती. ट्रिटमेंट घेतल्यानंतर आत्महत्या करणार असल्याचं पूजाने या अरुणला सांगितलं होतं. तसेच पूजाने एक किट आणून काही तपासणी केली होती. ती किट पॉझिटिव्ह आल्यानंतर अरुण घाबरला होता. त्यामुळे पूजावर नेमका कोणता उपचार सुरू होता? अरुण का घाबरला होता? असा असा सवालही केला जात आहे. (who is pooja arun rathod? what medical report says? read report)


संबंधित बातम्या:

एका मुलीची आत्महत्या, कथित मंत्र्याचं नाव, 11 ऑडिओ क्लिप, ऐका प्रत्येक क्लीप; वाचा शब्द न् शब्द जशास तसा!

पूजा राठोडचा गर्भपात ते पूजा चव्हाणची आत्महत्या, यवतमाळ ते पुणे 45 तासांचा घटनाक्रम

We Don’t Know Arun Rathod, The Shocking Revelation Of Pooja Chavan Mother