VIDEO | चित्रा वाघ यांच्या भाजप प्रवेशावेळी त्यांचा ‘बाप’ काय म्हणाला होता?

विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीचं 'घड्याळ' सोडून भाजपचं 'कमळ' हाती घेतलं होतं. (Sharad Pawar Chitra Wagh left NCP)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:31 AM, 28 Feb 2021
VIDEO | चित्रा वाघ यांच्या भाजप प्रवेशावेळी त्यांचा 'बाप' काय म्हणाला होता?
चित्रा वाघ, शरद पवार

मुंबई : राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या तत्कालीन अध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी राष्ट्रवादी सोडली, त्यावेळेस पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ (Kishor Wagh) यांच्याविरोधातील एसीबीचं प्रकरण अधोरेखित केलं होतं. त्या प्रकरणाची चौकशी होऊ नये, म्हणून वाघ भाजपमध्ये गेल्याची त्या वेळेस चर्चा होती. परंतु, ज्या कारणासाठी चित्रा वाघ भाजपमध्ये गेल्याचं त्यावेळी बोललं गेलं, त्यातून त्यांची सुटका झालीच नसल्याचं आता दिसत आहे. (What did Sharad Pawar say when Chitra Wagh left NCP to join BJP)

शरद पवार काय म्हणाले होते?

विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीचं ‘घड्याळ’ सोडून भाजपचं ‘कमळ’ हाती घेतलं होतं. भ्रष्टाचारविरोधी प्रकरणातील केसेसना तोंड देणं अशक्य झाल्याचं सांगत चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला, असा दावा त्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला होता. 1 ऑगस्ट 2019 रोजी पत्रकारांशी बोलताना पवारांनी हे वक्तव्य केलं होतं.

चित्रा वाघ यांच्या संस्थेशी संबंधित दोन फाईल भ्रष्टाचारविरोधी विभागाकडे आहेत. त्यांच्या पतीच्या करप्शन केसबाबत आरोपपत्र दाखल आहे. त्यांना या प्रकरणात तोंड देणं अशक्य झालं आहे. म्हणून आपण पक्ष सोडत असल्याचं चित्रा वाघ यांनी सांगितल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं होतं.

शरद पवारांचा ‘बाप’ असा उल्लेख

“आज मला पवार साहेबांची आठवण येते, साहेब मला तुमची खूप आठवण येते सकाळपासून…. 5 जुलैला गुन्हा दाखल झाला, मला चांगलं आठवतंय आणि 7 जुलै… त्या दिवशी ईद होती.. 2017… मी साहेबांकडे गेले होते, सिल्व्हर ओकला बोलावलं होतं त्यांनी. माझा बापच आहे. त्यांनी बोलावून घेतलं मला, आणि मी एफआयआरची कॉपी त्यांना दिली, पंचनाम्याची कॉपी मी दिली. साहेबांनी सगळं वाचलं, म्हणाले चित्रा याच्यात तुझा नवरा कुठेच नाहीये. मी म्हटलं साहेब हेच आहे.” अशी आठवण चित्रा वाघ यांनी काल सांगितली होती.

किशोर वाघ यांच्यावरील आरोप काय?

चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ हे परळच्या महात्मा गांधी रुग्णालयात मेडिकल रेकॉर्डर म्हणून कार्यरत होते. 1997 मध्ये तक्रारदार व्यक्तीच्या भावाचा स्पाइनल कॉर्डच्या शस्त्रक्रिये दरम्यान गांधी रुग्णालयात मृत्यू झाला होता. निष्काळजीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप केला गेला होता. त्यामुळे तक्रारदाराने पोलिसात धाव घेतली होती. त्यानंतर तक्रारदाराने राष्ट्रीय ग्राहक निवारण कक्षाकडेही तक्रार केली होती.

त्यानंतर वैद्यकीय नोंदी ठेवणाऱ्या किशोर वाघ यांनी 15 लाखांची नुकसान भरपाई मिळावी आणि तक्रारदाराच्या भावाच्या मुलाला नोकरी मिळावी म्हणून अर्ज करण्याची सूचना तक्रारादारास केली होती. त्यासाठी वाघ यांनी चार लाखांची लाचही मागितली असा आरोप आहे. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. (What did Sharad Pawar say when Chitra Wagh left NCP to join BJP)

झालं उलटंच…

विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर चित्रा वाघ यांनी भाजपप्रवेश केला. त्यावेळी शिवसेना-भाजप युतीमध्ये लढल्यामुळे युती सरकार येण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु झालं उलटंच. राजकीय घडामोडींनंतर भाजपचं सरकार आलं नाही, तर शिवसेना प्रणित महाविकास आघाडी स्थापन झाली. म्हणजे आधी सत्तेबाहेर राहिलेल्या चित्रा वाघ, आताही सत्तेबाहेर आहेत. वाघ आता महाविकास आघाडी सरकारविरोधात रान उठवत आहेत. या वेळेस पुन्हा त्याच प्रकरणात वाघ यांचे पती किशोर वाघ यांची चौकशी होती आहे. म्हणजे ज्या एका कारणासाठी चित्रा वाघ भाजपात गेल्याची चर्चा होती, त्यातून त्यांची सुटका झालीच नसल्याचं दिसत आहे.

भाजपमध्ये मेगाभरती

जुलै-ऑगस्ट 2019 मध्ये शरद पवारांचे कट्टर समर्थक आणि राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य मधुकर पिचड, त्यांचे सुपुत्र वैभव पिचड (Vaibhav Pichad), साताऱ्याचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhonsle), मुंबईच्या वडाळा येथील तत्कालीन काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर (Kalidas Kolambkar), नवी मुंबईचे राष्ट्रवादीचे तत्कालीन आमदार संदीप नाईक (Sandeep Naik) आणि राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या तत्कालीन अध्यक्षा चित्रा वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

संबंधित बातम्या :

पवारसाहेब आज मला तुमची खूप आठवण येतेय : चित्रा वाघ

मीही शरद पवारांच्या तालमीत तयार, ते संजय राठोडांना पाठीशी घालणार नाहीत : चित्रा वाघ

शिवेंद्रराजे आणि चित्रा वाघ यांच्या भाजप प्रवेशावर शरद पवारांचं स्पष्टीकरण

VIDEO | शरद पवार माझा बापच, चित्रा वाघ यांचा कंठ दाटला

(What did Sharad Pawar say when Chitra Wagh left NCP to join BJP)