Aaditya Thackeray: पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आदित्य ठाकरे दांडी मारण्याची शक्यता, नेमकं कारण काय?

शिवसेनेतील आमदारांनी बंड केल्यापासून पक्षाचे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी सबंध ठाकरे कुटुंब हे राबत आहे. गेल्या काही दिवसांपासून आदित्य ठाकरे हे शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून बंडखोर आमदारांच्या मतदार संघात जाऊन त्यांच्यावर हल्लाबोल तर करीत आहेतच पण थेट जनतेशी संवाद साधत आहेत. अनेक ठिकाणी त्यांनी हे बंडखोर आमदार गद्दार असल्याचाही उल्लेख केली आहे.

Aaditya Thackeray: पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आदित्य ठाकरे दांडी मारण्याची शक्यता, नेमकं कारण काय?
आ. आदित्य ठाकरे
Follow us
| Updated on: Aug 15, 2022 | 5:09 PM

मुंबई :  (Eknath Shinde) शिंदे सरकारचे मंत्रिमंडळ विस्तार खातेवाटप झाल्यानंतर आता 17 ऑगस्टपासून (Monsoon Session) पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे. मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे विराजमान झाल्यानंतरचे हे पहिलेच अधिवेशन असणार आहे. त्यामुळे याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे. अधिवेशनात राज्यातील जनतेच्या विविध समस्या घेऊन सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न हा विरोधकांचा असतो. मात्र, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी (Aaditya Thackeray) आदित्य ठाकरे हे अनुपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. एकीकडे एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर हे पहिलेच अधिवेशन होत असताना आणि सरकारला कोंडीत पकडण्याची संधी असतानाही आदित्य ठाकरे मात्र, पक्ष संघटनेच्या नियोजित कार्यक्रमात असणार आहेत.

ठाकरेंचा पक्ष संघटनेवर भर

शिवसेनेतील आमदारांनी बंड केल्यापासून पक्षाचे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी सबंध ठाकरे कुटुंब हे राबत आहे. गेल्या काही दिवसांपासून आदित्य ठाकरे हे शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून बंडखोर आमदारांच्या मतदार संघात जाऊन त्यांच्यावर हल्लाबोल तर करीत आहेतच पण थेट जनतेशी संवाद साधत आहेत. अनेक ठिकाणी त्यांनी हे बंडखोर आमदार गद्दार असल्याचाही उल्लेख केली आहे. त्यावरुनही राजकारण चांगलेच पेटले होते. आता 17 ऑगस्ट रोजी शिवसंवाद यात्रा ही रायगडात येणार आहे. या यात्रेतच आदित्य ठाकरे हे उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे.

शिवसंवाद यात्रेचा तिसरा टप्पा

शिवसेनेतील आमदारांनी बंडाची भूमिका घेतल्याने शिवसेनेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आमदार, खासदार आणि नंतर पदाधिकारी हे शिंदे गटातस सहभागी झाले आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांच्या मतदार संघात शिवसंवाद अशी यात्रा सुरु केली आहे. यापूर्वी कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा हे विभाग पूर्ण झाल्यानंतर आता 17 ऑगस्ट रोजी ठाकरे हे रायगड जिल्ह्यामध्ये दाखल होत आहेत. शिवाय दुसरीकडे पावसाळी आधिवेशन सुरु होत असताना देखील त्यांनी ह्या यात्रेला खंड दिलेला नाही.

आमदारांवर टीकास्त्र

बंडखोर आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसून आमदारांनी ही भूमिका घेतलेली आहे. याला सर्वसामान्य जनता कधीही माफ करणार नाही असे म्हणत पक्षाची धोरणे आणि विचार पोहचवण्याचे काम आदित्य ठाकरे हे करीत आहेत. शिवाय हे आमदार गद्दार नसून महा गद्दार असल्याचा उल्लेखही त्यांनी अनेकवेळा केला आहे.

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.