मुंबई: मनसेचे पदाधिकारी जमील शेख यांच्या हत्या प्रकरणात (jamil shaikh case) ठाण्यातील नगरसेवक नजीब मुल्ला यांचं नाव आलंय. त्याबद्दल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटून नजीब मुल्लावर कारवाई करण्याची मागणी करणार आहे, असं मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणालेत. त्यावरून आता नजीब मुल्ला कोण अशी चर्चा सुरू झालीय. नजीब मुल्ला हे राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत. ”सत्ताधारी पक्षाचे लोकच दिवसाढवळ्या लोकांना मारत असले तर हे बरोबर नाही. या प्रकरणात सरकार काय करतेय ते पाहणारच आहे. नाही तर दुसऱ्यांचेही हात बांधलेले नाहीत. खुनाला उत्तर खुनाने देणं हे चित्रं महाराष्ट्रासाठी योग्य राहणार नाही”, असा इशाराही राज ठाकरेंनी दिलाय. (Who is Najeeb Mulla whom Raj Thackeray has asked Pawar to cover?)
ठाण्यातील मनसे पदाधिकारी जमील शेख यांची 23 नोव्हेंबर 2020 ला हत्या करण्यात आली. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी, जमील यांच्यावर गोळी झाडून त्यांना ठार केलं होतं. दुचाकीवर मागे बसलेल्या आरोपीने पिस्तुलाने नेम धरून जमील यांच्या डोक्यात गोळी झाडली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. ठाण्याच्या राबोडी परिसरात बाईक शेजारी त्यांचा मृतदेह आढळून आला.
महाराष्ट्र नविनर्माण सेनेचे राबोडीतील शाखाध्यक्ष जमील अहमद शेख (49) यांच्या खूनप्रकरणी उत्तर प्रदेशातील लखनऊ शहरातून अटक केलेल्या इरफान शेख (21) याला 15 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिलेत. उत्तर प्रदेशच्या स्पेशल टास्क फोर्स (STF) आणि ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने शनिवारी दुपारी यूपीतील लखनऊमधून त्याला ताब्यात घेतले. त्याला सोमवारी (5 एप्रिल) पहाटेच्या सुमारास वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने ठाण्यात आणले होते. त्यानंतर त्याला रितसर अटक करण्यात आली.
अटकेनंतर सोमवारी दुपारी त्याला ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले. इरफान याला दोन लाख रुपयांची सुपारी ओसामा शेख याने दिल्याची माहिती चौकशीत समोर आल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेने न्यायालयात दिली. विशेष म्हणजे या प्रकरणात ठाण्याचे राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांचं नाव आल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय.
>> नजीब मुल्ला हे ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत.
>> 2002 पासून ते नगरसेवक असून, ठाणे महापालिकेत राष्ट्रवादीचे गटनेतेही
>> कोकण मर्केंटाईल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड येथे महाराष्ट्र आणि गोवा राज्याचे अध्यक्ष.
>> राष्ट्रवादीचे निष्ठावान म्हणून ओळख
>> ठाण्यातील पाचपाखाडी भागात चांगला दबदबा
संबंधित बातम्या:
Raj Thackeray PC LIVE : दहावी-बारावी विद्यार्थ्यांना प्रमोट करा, राज ठाकरे यांची पत्रकार परिषद
महाराष्ट्रात कोरोना का वाढला?; राज ठाकरे यांनी सांगितली दोन कारणं!
Who is Najeeb Mulla whom Raj Thackeray has asked Pawar to cover?