तर हा त्रास नको म्हणून मी ती सुरुवात केली आणि आता ड्रायव्हिंग सुरूच आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
मुंबई: माझे सरकारी चालक आहेत त्यांना पण किती दडपून ठेवायचं, किती बंधनं ठेवायची. मग प्रत्येकवेळी त्यांची कोरोना टेस्ट करा. तर हा त्रास नको म्हणून मी ती सुरुवात केली आणि आता ड्रायव्हिंग सुरूच आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) म्हणाले आहेत. कोरोनाचं संकट आलं आणि साहजिकच आहे, अंतर ठेवा हा नियम लागला. गाडीत जास्त माणसं नको. मग मी विचार केला की, माझे सरकारी चालक आहेत त्यांना पण किती दडपून ठेवायचं, किती बंधनं ठेवायची, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अधोरेखित केलं आहे. (Why Are You Driving ?, Says Reason Uddhav Thackeray In Saamna Interview)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना दैनिक ‘सामना’साठी मुलाखत दिली. मी गाडी चालवतच राहीन. ठीक आहे, जेव्हा मला वाटेल तेव्हा मी परत गाडीत नुसता बसून प्रवास करेन. मुख्यमंत्रिपद त्याची प्रभावळ काही जण मानतात, पण तसं काही नाहीच. मुख्यमंत्रीसुद्धा माणूसच असतो. पंतप्रधानही माणूसच असतो. फक्त आपल्यातली माणुसकी कुणी घालवू नये, जाऊ देऊ नये, हे ज्याने त्याने पाहायला पाहिजे. ज्या दिवशी मुख्यमंत्र्यातली, पंतप्रधानातली माणुसकी मरेल त्या दिवशी तो पंतप्रधान किंवा तो मुख्यमंत्री कामाचा नाही. जमिनीवर आहेत, क्लचवर आहेत, ब्रेकवर आहेत आणि एक्सिलेटरवरही आहेत आणि हातात स्टेअरिंगपण आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
मी शांत आहे, संयमी आहे. पण याचा अर्थ मी काही नामर्द नाही आणि ज्या पद्धतीने आमच्या लोकांच्या कुटुंबीयांवर हल्ले सुरू झाले आहेत ही पद्धत निदान महाराष्ट्राची तरी नाही. नक्कीच नाही. कुटुंबीयांवर येणार असाल, मुलाबाळांवर येणार असाल तर आमच्या अंगावर येणाऱ्यांना ज्यांना ज्यांना कुटुंब आणि मुलंबाळं आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की, तुम्हालाही कुटुंब आणि मुलंबाळं आहेत. तुम्ही धुतले तांदूळ नाहीत. तुमची खिचडी कशी शिजवायची ती आम्ही शिजवू शकतो, असं त्यांनी विरोधकांना ठणकावलं.
तुम्ही सीबीआयचा दुरुपयोग करायला लागलात तेव्हा अशी वेसण घालावीच लागते. ईडी काय, सीबीआय काय त्यावर राज्याचा अधिकार नाही? आम्ही देतो ना नावं, आमच्याकडे आहेत नावं. मालमसाला तयार आहे. पूर्ण तयार आहे. पण सूडाने जायचं का? मग जनतेने आपल्याकडून काय अपेक्षा ठेवायची. सूडानेच वागायचं असेल तर तुम्ही एक सूड काढा, आम्ही दहा सूड काढू, असा इशाराही त्यांनी दिला. सूडाने वागायचंच आहे का? माझी आजही प्रामाणिक इच्छा आहे की, हे असं विकृत बुद्धीचे चाळे तुम्ही करू नका. कारण विकृती ही विकृती असते. त्या मार्गाने जायची आमची आज तरी इच्छा नाही. आम्हाला भाग पाडू नका, असा इशाराही त्यांनी दिला.
माझ्या दसऱ्याच्या भाषणात मी तेच बोललो होतो. माझ्या आजोबांच्या पहिल्या मेळाव्याच्या भाषणाचा संदर्भ दिला होता की, महाराष्ट्र मेल्या आईचं दूध प्यायलेला नाही. वाघाची अवलाद आहे. महाराष्ट्राच्या वाटेला कुणी जाईल किंबहुना महाराष्ट्राला कोणी डिवचेल तर काय होतं याचे इतिहासात दाखले आहेत. भविष्यात पाहायचे असतील तर पाहायला मिळतील आणि अशी ही संकटं अंगावर घेत पचवून त्यांचा खात्मा करत महाराष्ट्र पुढे जात राहिला, महाराष्ट्र कधी थांबला नाही. महाराष्ट्र कधी थांबणार नाही. कुणी किती आडवे आले तरी त्या आडवे येणाऱ्यांना आडवं करून महाराष्ट्र पुढे जाईल. म्हणून महाराष्ट्राला आव्हानं देणाऱ्यांना माझं म्हणणं आहे की, अशी आव्हानं देऊन तुम्ही सूडचक्र करणार असाल तर सूडचक्रात आम्हाला जायची इच्छा नाही. पण तुम्ही तशी वेळ आणलीतच तर तुम्ही आम्हाला म्हणता ना हिंदुत्ववादी तर मग ठीक आहे. सूडचक्र तुमच्याकडे, आमच्याकडे सुदर्शन चक्र आहे. आमच्याकडे पण चक्र आहे. आम्हीही मागे लावू शकतो, असा इशारा देतानाच केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. (Cm Uddhav Thackeray Warns Bjp Against Misuse Of Ed Cbi)
यावेळी त्यांनी तपास यंत्रणाचा गैरवापर होत असल्याचा आरोप केला. माझं या सगळ्या घडामोडींवर लक्ष आहे. मी मागेही म्हटलं होतं की मी शांत आहे, संयमी आहे. पण याचा अर्थ मी काही नामर्द नाही आणि ज्या पद्धतीने आमच्या लोकांच्या कुटुंबीयांवर हल्ले सुरू झाले आहेत ही पद्धत निदान महाराष्ट्राची तरी नाही. नक्कीच नाही, असंही ते म्हणाले.
LIVE : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची अभिनंदन मुलाखत लाईव्ह https://t.co/ImprYhMJl7 #UddhavThackeray pic.twitter.com/GVlW9ZQzDc
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 27, 2020
(Why Are You Driving ?, Says Reason Uddhav Thackeray In Saamna Interview)
संबंधित बातम्या:
मी नामर्द नाही, ‘ईडी’ वगैरेचा गैरवापर करून दबाव आणाल तर याद राखा, उद्धव ठाकरेंचा रोखठोक इशारा
‘सामना’च्या धमाका मुलाखतीपूर्वी नितेश राणेंचं ट्विट; उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर शेलक्या शब्दात टीका