शेतकरी विधेयक संसदेत मंजूर करण्यासाठी एवढी घाई कशासाठी?, प्रफुल पटेलांचा मोदी सरकारला सवाल

शरद पवार, देवेगौडा, प्रकाश सिंग बादल यांसारख्या तज्ज्ञ लोकांचे मत केंद्र सरकारने घ्यायला पाहिजे होते.

शेतकरी विधेयक संसदेत मंजूर करण्यासाठी एवढी घाई कशासाठी?, प्रफुल पटेलांचा मोदी सरकारला सवाल

गोंदिया : शेतकरी विधेयक संसदेत फार घाईघाईने मंजूर करण्यात आले, त्या कार्याला इतकी घाई करण्याची गरज नव्हती, असं राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल म्हणाले आहेत. ते आज गोंदियामध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. (praful patel on farmer bill)

शरद पवार, देवेगौडा, प्रकाश सिंग बादल यांसारख्या तज्ज्ञ लोकांचे मत केंद्र सरकारने घ्यायला पाहिजे होते. मीदेखील या बिलाचा अभ्यास केला असून, त्यात अनेक त्रुटी आहेत. तसेच अनेक चुकीच्या तरतुदी या बिलात आहेत. सोबतच या बिलात किमान आधारभूत किंमत मिळणार की नाही, याचा उल्लेख देखील केंद्र सरकारने करायला पाहिजे होता. मात्र तसे केले नाही.

तोंडी घोषणा केली, जर तज्ज्ञ लोकांचे मत घेऊन घाईघाई न करता आरामात हे बिल पारित केले असते, तर शेतकऱ्यांनी या बिलाचे स्वागत केले असते, असे मत प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केले. सोबतच अजितदादांना ईडीने नोटीस पाठविणे म्हणजे लोकांत संभ्रम निर्माण करण्याचा प्रकार असल्याचंही ते म्हणाले आहेत. त्यांना सिंचन प्रकरणात क्लीन चिट मिळाली आहे, असे मत प्रफुल पटेल यांनी व्यक्त केले.

केंद्र सरकारने 5 जून रोजी शेती आणि शेतकरी यांच्याशी संबंधित 3 अध्यादेशांना मंजुरी दिली होती. यानंतर मान्सून सत्रात सरकारने  (14 सप्टेंबर) या अध्यादेशांची विधेयकं संसदेत मांडण्यात आली. त्यानंतर या राष्ट्रपतींनी मंजुरी दिल्यानंतर या अध्यादेशांचं कायद्यात रूपांतर झालं.

विरोध होत असलेले विधयकं

  1. शेतकऱ्यांचं उत्पन्न, व्यापार आणि शेतकऱ्यांचं उत्पादन, व्यापार आणि व्यवसाय संवर्धन सेवा विधेयक
  2. हमीभाव आणि कृषी सेवा विधेयक आणि शेतकरी सशक्तीकरण आणि संरक्षण विधेयक
  3. आवश्यक वस्तू (दुरुस्ती) विधेयक

वरील तिसरं विधेयक लोकसभेत 15 सप्टेंबरला मंजूर झालं. यामुळे शेतकऱ्यांना कृषी कंपन्यांवर अवलंबून राहावं लागेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतीमालाच्या हमीभावाची व्यवस्था संपवली जाईल, अशीही शंका शेतकरी व्यक्त करीत आहेत. तसेच यामुळे शेतकऱ्यांना मोठमोठ्या कृषी कंपन्यांवर विसंबून राहावं लागेल, अशीही शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत.

संबंधित महत्त्वाच्या बातम्या

‘…म्हणून कृषी विधेयकांवरील चर्चेवेळी मी संसदेत उपस्थित नव्हतो’

तृणमूल खासदाराने नियम पुस्तक फाडले, वेलमध्ये काँग्रेस-आपचा गोंधळ, राज्यसभेत कृषी विधेयकं मंजूर

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *