काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी विराजमान होणार का?; नाना पटोले म्हणतात…

नाना पटोलेंनीच येत्या काही दिवसांत नव्या भूमिकेत दिसणार असल्याचे संकेत दिलेत.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 21:52 PM, 21 Jan 2021
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी विराजमान होणार का?; नाना पटोले म्हणतात...
नाना पटोले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र

अंबरनाथः गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोलेंचं (nana patole) नाव निश्चित असल्याचं मानलं जात असल्याची चर्चा आहे. ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आता पुन्हा एकदा काँग्रेस प्रदेशाध्यक्षाच्या निवडीसंदर्भातील हालचालींना वेग आलाय. विशेष म्हणजे नाना पटोलेंनीच येत्या काही दिवसांत नव्या भूमिकेत दिसणार असल्याचे संकेत दिलेत.( Will Be The Congress State President ? Says Nana Patole)

मुरबाडमध्ये एका कार्यक्रमाप्रसंगी आले असता पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर नाना पटोलेंनी सूचक प्रतिक्रिया दिलीय. सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेत बदल हे चालतच राहतात. मला जर संधी मिळाली तर वेगळ्या भूमिकेत मी पुढे जाईन आणि तुमच्याकडे येईनही, असंही नाना पटोले म्हणालेत. वीजबिलावरही त्यांनी भाष्य केलंय. वीज बिलात राज्य सरकारने सूट द्यावी. लॉकडाऊनच्या काळात आलेल्या वीज बिलात राज्य सरकारने मदत करावी, असे मत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केलेय.

विदर्भातील मंत्र्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद द्या, बाळू धानोरकरांची फील्डिंग कोणासाठी?

ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये काँग्रेसला विदर्भात यश मिळाल्यानंतर राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी प्रदेशाध्यक्ष निवडीच्या चर्चेत उडी घेतली होती. ‘काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद विदर्भातील मंत्र्याला मिळावं’ अशी मागणी धानोरकरांनी केली आहे. बाळू धानोरकर यांनी हायकमांडची भेट घेत विदर्भासाठी दावेदारी केली.

नाना पटोलेंना का प्राधान्य?

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष मिळून काँग्रेसला डावलत असल्याची चर्चा आहे. आगामी काळात हे तिन्ही पक्ष एकत्र मिळून निवडणुका लढवण्याची शक्यताही आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासमोर बार्गेनिंग करण्यासाठी तितकाच तोलामोलाचा नेता असावा म्हणून काँग्रेसकडून अनुभवी नेत्याला प्रदेशाध्यक्षपद देण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे सुनील केदार, वडेट्टीवार आणि ठाकूर यांची नावे मागे पडून नाना पटोले यांना पक्षश्रेष्ठींकडून प्राधान्य देण्यात आल्याची चर्चा आहे.

‘महाराष्ट्रात ‘फायटर’ प्रदेशाध्यक्ष द्या’

महाराष्ट्रात काँग्रेसने नव्या प्रदेशाध्यक्षाची निवड करायची ठरवल्यास तो लढाऊ बाण्याचा असावा, अशी मागणी विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) यांनी केली होती. विदर्भात काँग्रेस पक्ष मजबूत आहे. त्यामुळे विदर्भाचा अध्यक्ष झाल्यास आनंद वाटेल, असेही त्यांनी म्हटले होते.

संबंधित बातम्या:

प्रदेशाध्यक्षपद न मिळाल्यास नाराज नेत्यांची समजूत काढण्यासाठी काँग्रेसचा नवा फॉर्म्युला

महाराष्ट्रात ‘फायटर’ प्रदेशाध्यक्ष द्या; विजय वडेट्टीवारांची सोनिया गांधींकडे मागणी

Will Be The Congress State President ? Says Nana Patole