पंकजा मुंडे शिवसेनेत प्रवेश करणार का?; संजय राऊत म्हणतात...

आमच्याकडे अशा प्रकारच्या ऑफर फक्त उद्धव ठाकरेच देऊ शकतात, असं संजय राऊतांनी स्पष्ट केले आहे.

पंकजा मुंडे शिवसेनेत प्रवेश करणार का?; संजय राऊत म्हणतात...

पुणेः एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपा नेत्या पंकजा मुंडेंच्या पक्षांतराची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनीसुद्धा भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडेंना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली होती. त्यावर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. (Sanjay Raut On Pankaja Munde)

मला असं वाटत नाही, पंकजा मुंडेंना शिवसेनेकडून कोणी ऑफर दिलेली आहे. आमच्याकडे अशा प्रकारच्या ऑफर फक्त उद्धव ठाकरेच देऊ शकतात, असं संजय राऊतांनी स्पष्ट केले आहे. खोतकर हे मराठवाड्यातील नेते आहेत. त्यांची एकत्र काही चर्चा झाली असेल. ते मला काही माहीत नाही. शेवटी प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा अधिकार आहे. एकनाथ खडसे हे गेल्या चार वर्षांपासून त्यांची खदखद व्यक्त करत होते. त्या खदखदीचा शेवट काय झाला आपण पाहिलाच, असंही संजय राऊतांनी अधोरेखित केले आहे. पंकजा मुंडेंविषयी माझ्याकडे फार माहिती नाही, असं म्हणत त्यांनी पंकजा मुंडेंच्या शिवसेना प्रवेशावर अधिक बोलणं टाळलं.

पुण्याच्या येणाऱ्या महापालिका निवडणुकीत चित्र बदललेलं असेल. आम्ही सगळेच पिंपरी-चिंचवड आणि पुण्याकडे लक्ष देत आहोत. निवडणुका कशा लढायच्या, त्यासंदर्भातही आमच्या चर्चा सुरू आहेत. पक्ष संघटनेकडे आमचं लक्ष देण्याचं काम सुरू आहे. काही नवीन लोकं येत आहेत, त्यासंदर्भात लवकरच घोषणा होतील, असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

युतीचे सरकार होते तेव्हा पण बाळासाहेब ठाकरे हे सरकार चालवतायत, असाच आरोप केला जात होतो, आता जेव्हा तीन पक्षांचे सरकार आहे, तेव्हा सरकारमधील ज्येष्ठ नेते शरद पवार मार्गदर्शन करत आहेत, तिकडे मोदी पण इतर राज्यांना मार्गदर्शन करत असतात, सल्ला देतात, सरकार जर शरद पवारांचा सल्ला घेत असेल तर कुणाला पोटदुखी का होतेय, असा सवालही राऊतांनी उपस्थित केला आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवर मोदींनीही लक्ष घालावं, यामध्ये उदयनराजे आणि संभाजीराजे यांनी मोदींकडे हा प्रश्न घेऊन जावा, आम्ही त्यांच्या नेतृत्वात जाऊ. चंद्रकांत पाटलाचे सरकार राहिले नाही, तर त्यांना पण अभ्यास करता आला असता, असा टोलाही संजय राऊतांनी चंद्रकांत पाटलांना लगावला आहे. मुळात महाराष्ट्राच्या प्रश्नावर राज्यपालांना भेटणे हा राज्याचा अपमान आहे. दुर्दैवाने आज जे आपल्या विचारांचे नाहीत, त्यांचा राजकारणात राहण्याचा अधिकार नाही, अशी मनोवृत्ती सध्या देशात तयार होतेय, बिहारच्या निवडणुकांकडे राज्याचे लक्ष लागलंय, बिहार निवडणुकीत जर काही गडबड झाली नाही, तर तेजस्वी यादव मुख्यमंत्री झाले तर नवल वाटायला नको, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

महाराष्ट्रात जे तीन पक्षांचे सरकार आहे त्यापुढे फार मोठे आव्हान आहे. महाराष्ट्रात मजबूत विरोधी पक्ष आहे आणि चांगल्या विरोधी पक्षाचे स्वागत केलं पाहिजे. एक उत्तम विरोधी पक्ष राहिला पाहिजे. त्याशिवाय राज्य आणि देश पुढे जाऊ शकत नाही. मधला काळ हा संकटाचा होता, कोरोनाची लढाई उद्धव ठाकरे यांनी चांगली लढली. इतर राज्यांमध्ये व्यवस्था त्यांच्या खिजगणतीतही नव्हत्या. या मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विषयक संकटाशी लढताना स्वत: नेतृत्व केल्याचाही संजय राऊतांनी उल्लेख केला आहे.

संबंधित महत्त्वाच्या बातम्या

शरद पवार की अमित शाह, यांच्यापैकी अधिक भीती कुणाची?, संजय राऊतांचं खोचक उत्तर

‘महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत’; राज ठाकरेंवरील टीकेनंतर मनसेचे राऊतांना सॉल्लिड प्रत्युत्तर

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *