दिवाळीनंतर शाळा सुरू करणार का?; अजित पवार म्हणतात...

दिल्लीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी बोलून पवार साहेब आपली भूमिका मांडतील.

दिवाळीनंतर शाळा सुरू करणार का?; अजित पवार म्हणतात...

मुंबईः दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याचा आढावा घेण्यात येईल, दिवाळीआधी शाळा सुरू होणार नसल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार(ajit pawar) म्हणाले आहेत. त्यांनी आज माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. कृषी कायदा आणि मंत्री कार्यपद्धतीबाबत आढावा घेण्यात आला आहे. दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याचा आढावा घेण्यात येणार असल्याचं अजितदादांनी सांगितलं आहे. (will school opening after diwali)

दिल्लीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी बोलून पवार साहेब आपली भूमिका मांडतील. कोरोनाची टेस्टिंग होत आहे, पॉझिटिव्ह संख्येपेक्षा बरे होणाऱ्या पेशंटची संख्या जास्त आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी याचा टप्पा पुढील काय असेल, यावर चर्चा झाली आहे. परतीच्या पावसाने काय परिणाम होईल या विषयावरदेखील चर्चा झाली, शेतकरी संघटनांच्या मागण्यांबाबत विचार विनिमय झाल्याचंही अजित पवार म्हणाले आहेत.

शेतकऱ्यांच्या फायद्याची भूमिका काय, याबाबत आम्ही चर्चा करू आणि राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल. कोरोना अद्याप पूर्ण आटोक्यात यायला तयार नाही. जीएसटी मीटिंग झाली, मला हजर राहता आलं नाही. जयंत पाटील या मीटिंगला उपस्थित होते. निर्मला सीतारामन यांनी सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलं. पुन्हा 12 किंवा 13ला पुन्हा मीटिंग होणार असल्याचंही अजित पवारांनी सांगितलं आहे.

मुख्यमंत्री यांनी मराठा संघटना आणि नेत्यांना बैठकीसाठी बोलावलं आहे, त्या ठिकाणी सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल. एमपीएससी परीक्षा घेऊच नये, असादेखील मतप्रवाह आहे, त्याबाबत आज चर्चा होणार असल्याचंही अजित पवारांनी म्हटलं आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, कोण काय बोललं हे अजूनही ऐकलेले नाही. मला ते ऐकू द्या, त्यानंतर या विषयावर बोलणं योग्य होईल, असंही अजित पवार म्हणाले आहेत.

संबंधित महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात अजित पवारांसह 69 जणांना क्लिन चीट

Ajit Pawar | उत्तर प्रदेशातील घटना माणूसकीला काळीमा लावणारी : अजित पवार

(will school opening after diwali)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *