राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार का?; आता जयंत पाटील म्हणतात…

आता जयंत पाटलांनीही या सर्व प्रकरणावर स्पष्टीकरण दिलंय.

  • दिनेश दुखंडे, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 15:51 PM, 21 Jan 2021
राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार का?; आता जयंत पाटील म्हणतात...
भाजपला निराशेने ग्रासले आहे. शिवसेनेशिवाय दुसरा पर्याय त्यांना दिसत नाही.

मुंबई : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त केल्यापासून राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय. इस्लामपुरात एका स्थानिक चॅनेलशी बोलताना जयंत पाटलांनी मुख्यमंत्रिपदाची राजकीय महत्त्वाकांक्षा बोलून दाखवली. त्यानंतर आता विरोधकांनीही जयंत पाटलांवर चांगलाच हल्ला चढवला. आता जयंत पाटलांनीही या सर्व प्रकरणावर स्पष्टीकरण दिलंय. (Will The NCP Be The Chief Minister?; Jayant Patil Says)

माझं वक्तव्य मोडतोड करून दाखवण्यात आलं. मला प्रश्न वेगळा विचारला होता, मी त्यावर बोलताना म्हटलं होतं की “आमच्या पक्षाचं संख्याबळ कमी आहे, मग आमचा मुख्यमंत्री होणार कसा?, असा यू-टर्न जयंत पाटलांनी घेतलाय. जयंत पाटलांनी टीव्ही 9 मराठीच्या प्रतिनिधीशी संवाद साधलाय, त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार हा प्रश्न उपस्थित का होत आहे. माझं बोलणं ट्विस्ट करून टाकलंय. चुकीची मुलाखत मोडतोय करून दाखवलीय. मी आज ट्विट करून नेमकं काय म्हणलोय ते सांगितलंय. मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल का, असं विचारलं होतं. त्यावर मी स्पष्टीकरण दिलंय. अनेक वर्षे काम करतोय, आज आमचं संख्याबळ नाही, पवार साहेब आमचे अंतिम निर्णय घेत असतात हे मी सांगितलं होतं. पण वक्तव्य ट्विस्ट करून दाखवलंय, असंही जयंत पाटील म्हणालेत.  विशेष म्हणजे या सर्व प्रकरणावर अजित पवारांनीही भाष्य केलंय. “जयंत पाटील साहेबांनी जी इच्छा व्यक्त केली आहे, त्या इच्छेला मी पाठिंबा देतो”, असं अजित पवार म्हणालेत.

जयंत पाटील नेमकं काय म्हणाले…?

मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न साकार करण्यासाठी जास्त संख्याबळाची, पक्षवाढीची गरज असते. त्यासाठी अथक प्रयत्न करावे लागतील, असं पाटील म्हणाले. मला हे माहितीय की आमच्याकडे 54 आमदार आहे. 54 आमदारांचा कसा मुख्यमंत्री होणार? त्यासाठी पक्षवाढीची अतोनात गरज आहे. या सगळ्या पार्श्वभूमीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार जे काही निर्णय घेतील तो मला मान्य आहे. राजकीय जीवनात सर्वोच्च पद प्राप्त करणं ही प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यामुळेच मीही मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न पाहात असल्याचं ते त्यांनी सांगितलं.

जयंतरावांचा तरुणांना कानमंत्र

यावेळी पाटील यांनी तरूणांना राजकीय यशाचा कानमंत्रही दिला. तरूणांना जर राजकारणात यायचं असेल तर त्यांनी फक्त पोस्टरबाजी करून चालणार नाही. त्यांना जनतेत उतरून काम करावं लागेल, असा सल्ला त्यांनी दिला.

जयंतरावांच्या मनात मुख्यमंत्रीपदाची इच्छा पण ते खरंच शक्य…?

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुमारे डझनभर नेते मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत. त्यामुळे जयंत पाटील मुख्यमंत्री होती का? याबाबत राजकीय निरीक्षकांच्या मनात साशंकता आहे. राष्ट्रवादीत अजित पवार, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, एकनाथ खडसे, अनिल देशमुख, नवाब मलिक, धनंजय मुंडे आदी मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असलेले अनेक चेहरे आहेत. त्यामुळे जयंत पाटील यांच्या मुख्यमंत्रीपदात अनेक अडथळे असल्याचं राजकीय निरीक्षक सांगतात.

संबंधित बातम्या

जयंत पाटील म्हणतात, मला मुख्यमंत्री व्हायचंय, अजित पवार म्हणाले….

मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न जयंत पाटलांचं, भाजपचा टोला रोहित पवारांना

Will The NCP Be The Chief Minister?; Jayant Patil Says