बॉलिवूड मुंबईतच राहणार, आम्ही काहीही घेऊन जायला आलो नाही; योगी आदित्यनाथ यांची ग्वाही

आम्ही काहीच घेऊन जायला आलो नाही. आम्ही तर नवी फिल्मसिटी तयार करण्यासाठी आलो आहोत, असं सांगतानाच बॉलिवूड मुंबईतच राहिल, अशी ग्वाही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली. (Yogi Adityanath pitches to Bollywood for business in Noida's film city)

बॉलिवूड मुंबईतच राहणार, आम्ही काहीही घेऊन जायला आलो नाही; योगी आदित्यनाथ यांची ग्वाही
योगी आदित्यनाथ सरकारचे मोठे पाऊल
Follow us
| Updated on: Dec 02, 2020 | 4:26 PM

मुंबई: आम्ही काहीच घेऊन जायला आलो नाही. आम्ही तर नवी फिल्मसिटी तयार करण्यासाठी आलो आहोत, असं सांगतानाच बॉलिवूड मुंबईतच राहिल, अशी ग्वाही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली. (Yogi Adityanath pitches to Bollywood for business in Noida’s film city)

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बॉलिवूड इंडस्ट्री उत्तर प्रदेशला घेऊन जाणार असल्याच्या चर्चेवरून जोरदार राजकारण रंगलं होतं. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना योगी आदित्यनाथ यांनी ही ग्वाही दिली. कुणीच कुणाची गोष्ट घेऊन जात नाही. ही काय पर्स आहे का? की ती कुणीही घेऊन निघून जाईल. ही खुली स्पर्धा आहे. सुरक्षा देण्याची, सामाजिक सुरक्षा देण्याची, कुणासोबत भेदभाव न करता चांगलं वातावरण देण्याची गरज आहे. ती प्रत्येकाने दिली पाहिजे, असं योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं. मुंबई फिल्मसिटी आपलं काम करेल. यूपीतील नवी फिल्मसिटी त्यांचं काम करेल, असंही ते म्हणाले.

बॉलिवूडमधील दिग्गजांचा अनुभव घेऊन त्यांच्या सूचनेनुसार नवं मॉडल तयार करायचं आहे. वर्डक्लास फिल्मसिटी तयार करण्यासाठी फिल्मी दुनियेच्या लोकांशी चर्चा केली. आम्ही कुणाचं काही घेऊन जाणार नाही. आम्हाला नव निर्मिती करायची आहे. त्यासाठी आलो आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

कुणाची गुंतवणूक कुणी घेऊन जाणार नाही. कुणालाही बाधा आणायची नाही. भारताची इकनॉमी वाढवायची आहे. मला वाटतं हेच सर्वांचंही लक्ष असलं पाहिजे, असा चिमटाही त्यांनी शिवसेनेला काढला. उत्तर प्रदेशात आतापर्यंत 3 लाख कोटीपेक्षा अधिक रकमेची गुंतवणूक झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईतील गुंतवणूकदारांशी चांगली चर्चा झाली.

उत्तर प्रदेशात आम्हाला वर्ल्ड क्लास फिल्मसिटी निर्माण करायची आहे. म्हणून व्यक्तिगतरित्या मी अनेकांना भेटलो. काहींशी सामूहिकपणेही चर्चा केली. फिल्मी दुनियेकडूनही आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला असल्याचंही त्यांनी सांगितलं. (Yogi Adityanath pitches to Bollywood for business in Noida’s film city)

संबंधित बातम्या:

योगी आदित्यनाथ यांनी फक्त मुंबईशीच पंगा घेतलाय का?; संजय राऊतांचा सवाल

उद्योगांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करण्यात काहीच गैर नाही; योगींच्या दौऱ्याची भाजपकडून पाठराखण

अपयशी राज्यातील बेरोजगारी लपवण्यासाठी मुंबईत आलेला ‘ठग’, योगींचे नाव न घेता मनसेची खरमरीत टीका

(CM Yogi Adityanath pitches to Bollywood for business in Noida’s film city)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.