मी सुसंस्कृत घरातला, राणेंवर मर्डर, अपहरणाचे गंभीर गुन्हे, खुद्द फडणवीसांनीच हे मांडलय, सरदेसाईंचं उत्तर

मला राजकारणाची आवड आहे. पण आज जे आरोप केले तसे कामं माझ्याकडून घडणारही नाहीत, असंही स्पष्टीकरण वरुण सरदेसाई यांनी दिलंय.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 19:06 PM, 15 Mar 2021
मी सुसंस्कृत घरातला, राणेंवर मर्डर, अपहरणाचे गंभीर गुन्हे, खुद्द फडणवीसांनीच हे मांडलय, सरदेसाईंचं उत्तर

मुंबईः भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेली स्फोटकांनी भरलेली गाडीच्या प्रकरणात थेट वरुण सरदेसाईंना ओढल्यानं मोठं राजकारण सुरू झालंय. त्यालाच आता युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिलंय. मी सुसंस्कृत कुटुंबातील आहे. मला राजकारणाची आवड आहे. पण आज जे आरोप केले तसे कामं माझ्याकडून घडणारही नाहीत, असंही स्पष्टीकरण वरुण सरदेसाई यांनी दिलंय. (Yuva Sena Leader Varun Sardesai Criticized On Nitesh Rane Ambani explosives Issue)

”राणेंवर मर्डर, अपहरणाचे गंभीर गुन्हे दाखल”

राणेंवर मर्डर, अपहरणाचे गंभीर गुन्हे दाखल आहे, खुद्द फडणवीसांनीच हे मांडलय, आज ते भाजपमध्ये गेलेत तर महाविकास आघाडीतील विविध नेत्यांवर आरोप करत आहेत. गेले काही दिवस ते माझ्यावर वैयक्तिकरीत्या आरोप करत आहेत. राणे कुटुंबीयांना जनता अजितबात गांभीर्यानं घेत नाही. त्यांना भीक घालत नाही, असंही वरुण सरदेसाई म्हणालेत.

मी आमदार नितेश राणे यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार

त्यांनी जे आरोप केलेत, ते सिद्ध करावेत नाही तर कायदेशीर प्रक्रियेला तयार राहावे, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर अतिशय घाणेरडे आरोप केलेत. ते सगळे आरोप तथ्यहीन असून, त्या आरोपांमुळे मी आमदार नितेश राणे यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकत आहे, असंही वरुण सरदेसाई यांनी स्पष्ट केलंय.

मी सुसंस्कृत कुटुंबातील, मला राजकारणाची आवड: वरुण सरदेसाई

आपण सगळे मला युवासेनेचा सचिव म्हणून ओळखता. त्याच्या आधीची मी माझी पार्श्वभूमी सांगतो. दहावीत मला 91 टक्के गुण मिळाले. त्यानंतर बारावीत मला डिस्टिन्क्शन मिळालं. त्यानंतर मुंबई विद्यापीठात मी सिव्हिल इंजिनीअरची पदवी मिळवली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण घेतलेल्या अशा जगातील प्रसिद्ध कोलंबिया विद्यापीठात मी मास्टर्स इन सिव्हिल इंजिनीअरची पदवी मिळवली. ही पदवी अगदी एका वर्षात मिळवली. मी ते करून परत आलो. माझ्या वडिलांचा व्यवसाय आहे. युवा सेनेत काम करत असताना मी युवा सेनेत काम करतो. माझे वडील मॅकेनिल इंजिनिअर आहेत. त्याचबरोबर माजे आजोबाही इंजिनिअर आहे. मी सुसंस्कृत कुटुंबात आहे. मला राजकारणाची आवड आहे. पण आज जे आरोप केले तसे कामं माझ्याकडून घडणारही नाहीत, असंही वरुण सरदेसाई म्हणालेत.

नितेश राणेंनी आरोप केलेले वरुण सरदेसाई कोण?

वरुण सरदेसाई यांच्याकडे युवासेनेच्या सचिव पदाची जबाबदारी आहे. ते पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ लागतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या भगिनीचे ते पुत्र आहेत. वरुण यांच्याकडे युवासेनेच्या सचिवपदासह शिवसेनेच्या आयटी सेलचीही जबाबदारी आहे. वरुण सरदेसाई हे पेशाने सिव्हिल इंजिनिअर आहेत. आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवाली अशी जाहीर मागणी सर्वप्रथम वरुण यांनीच केली होती. लोकसभा निवडणुकीच्या वेळी वरुण सरदेसाई हे शिवसेनेचे स्टार प्रचारक होते. आदित्य ठाकरेंच्या जन आशीर्वाद यात्रेच्या नियोजनात वरुण सरदेसाई यांचा मोठा सहभाग होता.

2017 मधील कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीतही त्यांनी महत्त्वाची जबाबदारी पेलली होती. 2014 मधील लोकसभा निवडणुकीत श्रीकांत शिंदेंसाठी त्यांनी प्रचार केला होता. विशेष म्हणजे वरुण सरदेसाई गेल्या वेळी विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यताही वर्तवली जात होती.

संबंधित बातम्या :

वाझे सट्टेवाल्यांकडून खंडणी उकळतो पण तो पुढे कुणाला देतो?; नितेश राणेंचा गंभीर आरोप

मोठी बातमी: सचिन वाझेंची प्रकृती पुन्हा खालावली; उपचारासाठी जे.जे. रुग्णालयात हलवले

Yuva Sena Leader Varun Sardesai Criticized On Nitesh Rane Ambani explosives Issue