पुण्यात अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू, पोस्टमॉर्टमसाठी डेडबॉडीमागे 2 हजारांची मागणी

चाकण (पुणे) : चाकण उद्योगनगरीत महाळुंगे येथे कार आणि दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला. या अपघतात दुचाकींवरील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी मृत्यूमुखी पडलेल्यांचे मृतदेह हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र, मृत्यूनंतरही या दुचाकीस्वारांची परवड संपली नाही. प्रत्येक मृतदेहामागे दोन हजार रुपये दिल्यास शवविच्छेदन (पोस्टमॉर्टम) करु, असे चाकण ग्रामीण रुग्णालयाकडून सांगण्यात आले. त्यामुळे कसलेही रक्ताचे …

पुण्यात अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू, पोस्टमॉर्टमसाठी डेडबॉडीमागे 2 हजारांची मागणी

चाकण (पुणे) : चाकण उद्योगनगरीत महाळुंगे येथे कार आणि दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला. या अपघतात दुचाकींवरील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी मृत्यूमुखी पडलेल्यांचे मृतदेह हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र, मृत्यूनंतरही या दुचाकीस्वारांची परवड संपली नाही. प्रत्येक मृतदेहामागे दोन हजार रुपये दिल्यास शवविच्छेदन (पोस्टमॉर्टम) करु, असे चाकण ग्रामीण रुग्णालयाकडून सांगण्यात आले. त्यामुळे कसलेही रक्ताचे नाते नसताना, या अपघातग्रस्तांच्या मदतीला धावलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांचीही फरफट होताना दिसते आहे.

चाकण तळेगाव रोडवर महाळुंगे येथे एचपी कंपनीसमोर मध्यरात्रीच्या सुमारास अर्टिगा कार आणि दोन दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन दुचाकीवरील पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. चंद्रशेखर सूरज लाला विश्वकर्मा (वय 38 वर्षे), सुनील शर्मा (वय 48 वर्षे), दीपनारायण हरिवंश विश्वकर्मा (वय 24 वर्षे), सत्यवान पांडे (वय 45 वर्षे) आणि संजय विश्वकर्मा (वय 38 वर्षे) अशी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत.

पाचही जणांचे मृतदेह घेऊन, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र ओतबिहारी सिंग हे चाकण ग्रामीण रुग्णालयात गेले. खरंतर रवींद्र ओतबिहारी सिंग यांचं मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींशी कोणतेही रक्ताचे नाते नव्हते, मात्र माणुसकीच्या नात्याने त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी चाकण ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र, चाकण ग्रामीण रुग्णालयाच्या मनमानी कारभाराने, सामाजिक कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक मिळालीच, मात्र त्यांच्याकडे पैशाचीही मागणी करण्यात आली.

तब्बल 12 तास उलटूनही या अपघातातील मृतदेहांचे शवविच्छेदन अद्याप करण्यात आले नाही. शवविच्छेदनासाठी (पोस्टमॉर्टम) प्रत्येक मयत व्यक्तीचे 2000 रुपये प्रमाणे पैसे द्यावे लागतील, अन्यथा शवविच्छनदन आमच्या सोईने, पद्धतीने करु, असे चाकण ग्रामीण रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या 10 ते 12 तासांपासून अपघातातील मृतदेहांची हेळसांड सुरु आहे.

VIDEO : पाहा सामाजिक कार्यकर्ते रवींद्र ओतबिहारी सिंग काय म्हणाले?

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *