भिडे पुलावरून उडी मारण्याची पैज जीवावर बेतली, मुठा नदीत तरुण बेपत्ता

प्रशासन नागरिकांना पावसाळ्यात (Rain) नेहमीच सावधगिरीच्या सुचना देते. मात्र, तरिही काही उत्साही तरुणांकडून याकडे दुर्लक्ष केले जाते.

भिडे पुलावरून उडी मारण्याची पैज जीवावर बेतली, मुठा नदीत तरुण बेपत्ता

पुणे: प्रशासन नागरिकांना पावसाळ्यात (Rain) नेहमीच सावधगिरीच्या सुचना देते. मात्र, तरिही काही उत्साही तरुणांकडून याकडे दुर्लक्ष केले जाते. पुण्यात (Pune) असाच एक प्रकार समोर आला आहे. दोन युवकांनी दुथडी भरून वाहणाऱ्या मुठा नदीत (Mutha River) पोहण्याची पैज (Swimming Challenge) लावली. मात्र, ही पैज त्यातील एका तरुणाच्या जीवावर बेतली.

पुण्यातील भिडे पुलावरून (Bhide Bridge) एका युवकाने पाण्यात उडी मारली. मात्र, पाण्याचा वेग इतका जास्त होता की त्याला त्यात तग धरता आला नाही आणि तो वाहून गेला. प्रकाशसिंह श्रीभवान बोहरा (वय 20) असं वाहून गेलेल्या तरुणाचं नाव आहे. सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पैज लावणाऱ्या असीभ अशोक उफिल (वय 18) या युवकाला डेक्कन पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हे दोघेही नारायण पेठेतील एका हॉटेलमध्ये कामाला आहेत.

दरम्यान, रविवारी (8 सप्टेंबर) खडकवासला धरणातून मुठा नदीत 18,419 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे मुठा नदी दुथडी भरून वाहत होती. नदी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने पुण्यातील भिडे पूलही पाण्याखाली गेला. यानंतर रहदारीसाठी भिडे पूल बंद करण्यात आला. प्रशासनाने पुलावरील दोन्ही बाजूची वाहतूक थांबवली. भिडे पुलावरील वाहतूक बंद झाल्याने शहरातही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

पुण्यातील धरण क्षेत्रांमध्ये पावसाची संततधार सुरू आहे. सततच्या पावसाने धरण साठ्यात पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळं खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *