खात्री केल्याशिवाय कोरोना लसीबाबत नकारात्मक बातमी पसरवू नका, आदर पुनावाला यांचं आवाहन

कोरोना लसीबाबत काही नकारात्मक माहिती असल्यास त्या माहितीची आधी खात्री करा, ती खरी असल्यास तर लोकांना सांगा, असं आवाहन सीरमचे प्रमुख आदर पुनावाला यांनी केलं (Adar Poonawalla appeal peolpe to not send negative information about vaccine).

खात्री केल्याशिवाय कोरोना लसीबाबत नकारात्मक बातमी पसरवू नका, आदर पुनावाला यांचं आवाहन
Follow us
| Updated on: Nov 28, 2020 | 7:56 PM

पुणे : कोरोना लसीबाबत काही नकारात्मक माहिती असल्यास त्या माहितीची आधी खात्री करा, ती खरी असेल तरच लोकांना सांगा, असं आवाहन सीरमचे प्रमुख आदर पुनावाला यांनी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (28 नोव्हेंबर) पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देत कोरोना लस निर्मितीच्या कामाचा आढावा घेतला. मोदींच्या भेटीनंतर आदर पुनावाला यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली Adar (Poonawalla appeal peolpe to not send negative information about vaccine).

“संपूर्ण जग कोरोना लसीची वाट बघत आहे. लस कधी येईल? असा प्रश्न संपूर्ण जगाकडून विचारला जात आहे. लसीसाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणं जरुरीचं आहे. प्रसारमध्यमं, केंद्र सरकार, लस उत्पादक यांनी सध्याच्या परिस्थितीत योग्य माहिती लोकांना द्यावी. खात्रीशिवाय कोणत्याही प्रकारची नकारात्मक बातमी पसरवू नका ज्यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण होईल. खात्री केल्यानंतर लोकांना अधिकृत माहिती देण्यात येईल”, असं पुनावाला म्हणाले.

पंतप्रधान मोदींच्या भेटीविषय पुनावाला काय म्हणाले?

“जगभरात विविध कोरोना लस तयार होत आहेत. पंतप्रधान मोदींनी आजच्या भेटीत सीरमच्या लसीची माहिती घेतली. सध्या भारत सरकार किती लस खरेदी करणार हे मात्र अद्याप निश्चित झालेलं नाही. आम्ही पुढील 2 आठवड्यात तात्काळ परवान्यासाठी देखील अर्ज करणार आहोत. आम्ही सर्वात आधी भारतात कोरोना लस वितरण करु, नंतर जगभरातील कोव्हॅक्स देशांमध्ये वितरण होईल”

आदर पुनावाला यांनी यावेळी भारतात कोरोना लस साठवण्यासाठीच्या सुविधांवरही भाष्य केलं. ते म्हणाले ,”भारतात 1 किंवा 2 डिग्री सेल्सीयस तापमानावर साठवण्याची मोठी क्षमता आहे. मात्र, उणे 20 डिग्री सेल्सीअस तापमानासाठी मात्र आपल्याकडे कमी सुविधा आहेत.”

“ही एक उत्तम लस असून ही लस घेतल्यानंतर रुग्णालयात दाखल होण्याची गरज नाही. तसेच ही लस रुग्णाच्या शरीरात प्रवेश करणाऱ्या 60 टक्के विषाणूंना रोखते,” असंही ते म्हणाले (Adar Poonawalla appeal peolpe to not send negative information about vaccine).

संबंधित बातमी :

सर्वात आधी भारतात कोरोना लस वितरण करणार : आदर पुनावाला

Non Stop LIVE Update
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात.
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर.
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट.
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली.
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका.
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे.
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा.