बाबासाहेब पुरंदरेंना 'पद्मविभूषण' हा महाराष्ट्राचा अपमान : संभाजी ब्रिगेड

पुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पद्मविभूषण पुरस्कारावरुनही आता वादाला सुरुवात झाली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज बाबासाहेब पुरंदरे यांना देशाचा दुसरा सर्वात मोठा पुरस्कार ‘पद्मविभूषण’ घरी जाऊन प्रदान केला. त्यानंतर आता संभाजी ब्रिगेडने त्याला आक्षेप घेतला आहे. “बाबासाहेब पुरंदरेंना पद्मविभूषण देणे हा महाराष्ट्राचा अपमान, हे चुकीचा इतिहास लिहिण्याबद्दल’चे पद्मविभूषण आहे”, अशी …

बाबासाहेब पुरंदरेंना 'पद्मविभूषण' हा महाराष्ट्राचा अपमान : संभाजी ब्रिगेड

पुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पद्मविभूषण पुरस्कारावरुनही आता वादाला सुरुवात झाली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज बाबासाहेब पुरंदरे यांना देशाचा दुसरा सर्वात मोठा पुरस्कार ‘पद्मविभूषण’ घरी जाऊन प्रदान केला. त्यानंतर आता संभाजी ब्रिगेडने त्याला आक्षेप घेतला आहे.

“बाबासाहेब पुरंदरेंना पद्मविभूषण देणे हा महाराष्ट्राचा अपमान, हे चुकीचा इतिहास लिहिण्याबद्दल’चे पद्मविभूषण आहे”, अशी टीका संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी केली.  महाराष्ट्रातला शिवद्रोही पुरस्कार म्हणून या पुरस्काराकडे पाहिलं गेलं पाहिजे, आज काळा दिवस आहे, असाही घणाघात त्यांनी केला.

पुरंदरे यांना आरएसएसकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाद्वारे बदनाम करण्याची सुपारी दिली गेली. सुपारी घेणाऱ्या पुरंदरे यांना ‘पद्मविभूषण’ देणे हा तमाम शिवप्रेमींचा अपमान आहे. हा पुरस्कार बदनामी करण्याचे सरकारचे अधिकृत सर्टिफिकेट आहे. हे विकृत आणि खोटा इतिहास लिहिण्याबद्दलचे पद्मविभूषण आहे, असं संतोष शिंदे म्हणाले.

बाबासाहेब पुरंदरेंना पद्मविभूषण

बाबासाहेब पुरंदरे यांना जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांच्‍या हस्‍ते पद्मविभूषण पुरस्‍कार त्‍यांच्‍या निवासस्‍थानी आदरपूर्वक प्रदान करण्‍यात आला. पुरंदरे यांना भारत सरकारने यंदा 2019 मध्‍ये पद्मविभूषण पुरस्‍कार जाहीर केला होता. 11 मार्च 2019 रोजी झालेल्या पुरस्‍कार प्रदान सोहळ्यास वैयक्तिक कारणास्‍तव. बाबासाहेब पुरंदरे उपस्थित राहू शकले नव्‍हते. त्‍यामुळे जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी त्‍यांच्‍या निवासस्‍थानी जाऊन पद्मविभूषण पुरस्‍कार ( पद्मविभूषण पदक, मानपत्र आणि सनद ) आदरपूर्वक प्रदान केलं. यावेळी तहसिलदार तृप्‍ती कोलते-पाटील यांच्‍यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *