पुण्यात 'बालाजी', तर नागपुरात 'रामदेव बाबा' विद्यापीठाला स्वायत्त दर्जा

पुण्यातील बालाजी विद्यापीठासह नागपुरातील रामदेव बाबा विद्यापीठाला स्वायत्ततेचा दर्जा देण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

पुण्यात 'बालाजी', तर नागपुरात 'रामदेव बाबा' विद्यापीठाला स्वायत्त दर्जा

मुंबई : पुण्यातील बालाजी विद्यापीठासह नागपुरातील रामदेव बाबा विद्यापीठाला स्वायत्ततेचा दर्जा देण्यात आला आहे. काल (11 जून) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीय हा निर्णय घेण्यात आला. येत्या शैक्षणिक वर्ष 2019-20 पासून ही दोन्ही स्वायत्त विद्यापीठ सुरु करण्यात येणार आहे.

पुण्यातील श्री बालाजी सोसायटी यांच्या माध्यमातून या विद्यापीठाची स्थापना होत आहे. या संस्थेकडून याआधी व्यवस्थापन, अभियांत्रिकी, विधी हे अभ्यासक्रम चालवण्यात येत आहेत. मात्र स्वायत्ततेच दर्जा प्राप्त झाल्यानंतर मॉडर्न मॅनेजमेंट, टेलिकॉम मॅनेजमेंट, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट असे विविध अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहेत. या विद्यापीठामुळे पुणे परिसरातील विद्यार्थ्यांना विविध ज्ञानशाखांची अध्ययन सुविधा उपलब्ध होणार आहे.

तर नागपूरातील श्री रामदेवबाबा सार्वजनिक समिती यांच्या माध्यमातून या विद्यापीठाची स्थापना करण्यात येणार आहे. याआधी या संस्थेत व्यवस्थापन आणि अभियांत्रिकी विषयाचे अभ्यासक्रम सुरु आहे. त्यानंतर आता स्वायत्ततेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर या विद्यापीठातंर्गत विदर्भातील उद्योगांसाठी मनुष्यबळ निर्माण करण्याच्या दृष्टीने जिओ-टेक इंजिनिअरिंग, हीट पॉवर इंजिनिअरिंग, एनर्जी मॅनेजमेंट असे विविध अभ्यासक्रम राबवण्यात येणार आहेत. याचा लाभ नागपूर परिसरातील विद्यार्थ्यांसह उद्योगांना होणार आहे.

या दोन्ही स्वायत्ततेचा दर्जा प्राप्त झालेल्या विद्यापीठात सामाजिक आरक्षणासह महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी 40 टक्के जागा आरक्षित असणार आहेत. तसंच या बैठकीत विद्यापीठ स्थापनेचा प्रस्तावही विधान मंडळासमोर सादर करण्याच्या विधेयकाच्या मसुद्यालाही मान्यता देण्यात आली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *