पुण्यात बिर्याणीतील चिकनमध्ये रक्त, 15 टक्के डिस्काऊंट देऊन विषय संपवला

प्रसिद्ध एसपी बिर्याणीत अळ्या आढळल्याचं प्रकरण ताजं असतानाच आता आणकी एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये बिर्याणीतील चिकनमधून रक्त येत असल्याचं ग्राहकांना आढळून आलं. विशेष म्हणजे हॉटेल मालकाने बिलात 15 टक्के सूट देऊन विषय संपवल्याचं ग्राहकांचं म्हणणं आहे.

पुण्यात बिर्याणीतील चिकनमध्ये रक्त, 15 टक्के डिस्काऊंट देऊन विषय संपवला

पुणे : शिक्षणाचं माहेरघर असल्याने पुण्यातील अन्न खरंच सुरक्षित आहे का असा प्रश्न पुन्हा उपस्थित झालाय. प्रसिद्ध एसपी बिर्याणीत अळ्या आढळल्याचं प्रकरण ताजं असतानाच आता आणकी एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये बिर्याणीतील चिकनमधून रक्त येत असल्याचं ग्राहकांना आढळून आलं. विशेष म्हणजे हॉटेल मालकाने बिलात 15 टक्के सूट देऊन विषय संपवल्याचं ग्राहकांचं म्हणणं आहे.

रविवारी रात्री घडलेला हा प्रकार आहे. ग्राहकांना बिर्याणीचे फोटोही काढू दिले नाही. तक्रार करताच बिलाट सूट दिली आणि विषय संपवल्याचं बोललं जातंय. हॉस्टेलला राहणारी काही मुलं रविवारी रात्री कर्वेनगर येथील बिर्याणीच्या हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेली होती. जेवण करत असताना चिकनमधून रक्त येत असल्याचं निदर्शनास आलं.

आमच्याकडे चिकनचे पीस मोठे असल्यामुळे कधी तरी असा प्रकार घडू शकतो, असं हास्यास्पद स्पष्टीकरण हॉटेल मालकाने दिल्याचं ग्राहकांचं म्हणणं आहे. दरम्यान, बाहेर राहून शिक्षण घेणारी मुलं असल्यामुळे त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार देणं टाळलं. त्यामुळे या हॉटेलविरोधात कोणतीही कारवाई होऊ शकली नाही. अन्न आणि औषध प्रशासनाने स्वतःहूनच हॉटेलवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

पुण्यातील हा प्रकार नवा नाही. यापूर्वीही प्रसिद्ध एसपी बिर्याणीत अळ्या आढळल्याने खळबळ माजली होती. काही महिन्यांपूर्वीच एफसी रोडवरील काही हॉटेलवर छापा टाकत एफडीएने कारवाई केली होती, ज्यात प्रचंड अस्वच्छता आढळून आली होती. त्यामुळे कर्वे रोडवरील या हॉटेलमध्येही स्वच्छता होती का? चिकन स्वच्छ केलं जातं का? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *