हात-पाय तुटलेले, चिमुकल्याचा मृतदेह आढळल्याने पिंपरीत खळबळ

पुणे: पिंपरी चिंचवडमधील थेरगाव परिसरात एका 4 ते 5 वर्षीय लहानग्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.  धक्कादायक म्हणजे हा मृतदेह हात आणि पाय तोडलेल्या अवस्थेत आढळला आहे. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटविणे पोलिसांपुढे आव्हान आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपूर्वी ही हत्या झाल्याचा अंदाज आहे. शुक्रवारी सायंकाळी नियंत्रण कक्षातून थेरगाव …

, हात-पाय तुटलेले, चिमुकल्याचा मृतदेह आढळल्याने पिंपरीत खळबळ

पुणे: पिंपरी चिंचवडमधील थेरगाव परिसरात एका 4 ते 5 वर्षीय लहानग्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.  धक्कादायक म्हणजे हा मृतदेह हात आणि पाय तोडलेल्या अवस्थेत आढळला आहे. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटविणे पोलिसांपुढे आव्हान आहे.

गेल्या चार ते पाच दिवसांपूर्वी ही हत्या झाल्याचा अंदाज आहे. शुक्रवारी सायंकाळी नियंत्रण कक्षातून थेरगाव येथील संतोष मंगल कार्यालयाच्या शेजारी एका 4 ते 5 वर्ष वयाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार वाकड पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेतला. या मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. हा मृतदेह स्त्री आहे की पुरुष हे अद्याप समजलेलं नाही. पोलिसांनी हा मृतदेह रुग्णालयात पाठवला आहे. रुग्णालयाचे अहवाल मिळाल्यानंतर त्याबाबत अधिक तपास करण्यात येणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *