पबजी खेळताना झटके येऊन बेशुद्ध, उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू

पबजी गेम खेळत असताना झटका आल्याने एका 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू (Boy Death due to PUBG game) झाला आहे. ही घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली.

Boy Death due to PUBG game, पबजी खेळताना झटके येऊन बेशुद्ध, उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू

पुणे : पबजी गेम खेळत असताना झटका आल्याने एका 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू (Boy Death due to PUBG game) झाला आहे. ही घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली. विशेष म्हणजे गेम खेळत असताना तरुणाला झटके येऊन तो बेशुद्ध झाला आणि उपचारादरम्यान त्याच्या मृत्यू झाला. हर्षल देविदास मेमाणे असं मृत तरुणाचं (Boy Death due to PUBG game) नाव आहे.

हर्षल गुरुवारी (16 जानेवारी) सायंकाळी चार वाजता आपल्या राहत्या घरी मोबाईल फोनवर पबजी गेम खेळत होता. गेम खेळत असताना अचानकपणे हर्षलला झटके आल्याने तो बेशुद्ध पडला. त्याला तातडीने उपचारासाठी रावेत येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यादरम्यान हर्षलवर रुग्णालयात उपचत देखील सुरू होते. मात्र आज (18 जानेवारी) उपचारादरम्यान सकाळच्या सुमारास हर्षलचाचा मृत्यू झाला.

गेल्या काही दिवसांपासून पबजी या खेळावर भारतात बंदी आणली जावी अशी मागणी केली जात आहे. पण अद्याप तरी तशी बंदी आलेली नाही. एकीकडे पबजीवर बंदीची मागणी सुरु असताना दुसरीकडे तरुणाई मात्र या गेमपासून अजिबात दूर जाण्यास तयार नाही. एवढंच नव्हे तर अनेकजण हे या गेमच्या आहारी गेले आहेत. यामुळे भयानक परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. पबजी गेमच्या अति आहारी गेल्यामुळे अनेक ठिकाणी महाविद्यालयीन तरुणांची मानसिक स्थिती ढासळली असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे.

सध्याच्या ऑनलाईन युगात लहान मुलांपासून ते मोठ्या माणसापर्यंत सर्वजण मोबाईलमध्ये गुंतलेले असतात. या मोबाईलच्या वेडापायी आतापर्यंत अनेकांचे मृत्यू झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक मृत्यू ऑनलाईन व्हिडीओ गेम पबजीमुळे झाले आहेत. या गेमने झालेले आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *