तृप्ती देसाईंना धमकावल्याचा आरोप, आमदार बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल

भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंना धमकावल्या प्रकरणी प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Trupti Desai vs Bachchu Kadu). सहकारनगर पोलीस ठाण्यात बच्चू कडूंवर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.

तृप्ती देसाईंना धमकावल्याचा आरोप, आमदार बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल

पुणे : भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई यांना धमकावल्या प्रकरणी प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Trupti Desai vs Bachchu Kadu). सहकारनगर पोलीस ठाण्यात बच्चू कडूंवर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे (Case filed against Bachchu Kadu).

तृप्ती देसाई यांनी गेल्या 31 ऑक्टोबरला फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती (Trupti Desai Facebook Post). या पोस्टमध्ये त्यांनी स्वतःला शेतकऱ्यांचे नेते म्हणवून घेणारे बच्चू कडू शिवसेना आणि भाजप विरोधात आंदोलन का करत नाहीत, विदर्भात शेतकरी अडचणीत आहेत, असा सवाल केला होता. तृप्ती देसाईंच्या या पोस्टवर बच्चू कडू यांच्या समर्थकांनी तसेच, प्रहार जनशक्तीच्या पदाधिकाऱ्यांनी तृप्ती देसाई यांना फेसबुकवर शिवीगाळ आणि बदनामीकारक मजकूर लिहिला. अनेक वाईट कमेंट केल्या.

त्यानंतर तृप्ती देसाई आणि बच्चू कडू यांच्यात फोनवर संवाद झाला. यादरम्यान, बच्चू कडू आणि तृप्ती देसाई यांच्यामध्ये बाचाबाचीही झाली. त्यानंतर बच्चू कडू यांच्याकडून धमकी दिल्याची तक्रार तृप्ती देसाईंनी केली आहे. या संवादादरम्यान, तुम्ही मला फेसबुकवर उपदेश करू नका, स्वतःला मोठे समजू नका, अती शहाणपणा करू नका, अन्यथा तुम्हाला परिणामांना सामोरे जावे लागेल, अशी धमकी बच्चू कडू यांनी दिल्याचा उल्लेख तृप्ती देसाई यांनी तक्रारीत केला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *