पुणेरी टोमण्यांनी हैराण, चंद्रकांत पाटलांनी पुण्यात अखेर भाड्याने घर घेतलं

कोथरूड मतदारसंघामध्ये सहवास सोसायटीमध्ये (Chandrakant Patil Pune Home) अखेर एक फ्लॅट भाड्याने घेत, विरोधक आणि टिपिकल पुणेकरांच्या मनात भाड्याने का होईना स्थान मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.

पुणेरी टोमण्यांनी हैराण, चंद्रकांत पाटलांनी पुण्यात अखेर भाड्याने घर घेतलं
Follow us
| Updated on: Oct 05, 2019 | 9:46 PM

पुणे : अगोदरच बाहेरचा-बाहेरचा म्हणून ‘पुणेरी ‘ टोमण्यांनी हैराण झालेले पुण्याचे जावई चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil Pune Home) अखेर पुण्यात ‘भाडेकरू’ झाले आहेत. त्यांनी कोथरूड मतदारसंघामध्ये सहवास सोसायटीमध्ये (Chandrakant Patil Pune Home) अखेर एक फ्लॅट भाड्याने घेत, विरोधक आणि टिपिकल पुणेकरांच्या मनात भाड्याने का होईना स्थान मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.

चंद्रकांत पाटील यांची कोथरूड मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीका सुरू झाली. विशेष म्हणजे स्थानिक आमदार मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापून पाटील यांना उमेदवारी दिल्याने कोथरूड परिसरात बाहेरचा नको घरचा हवा, ‘आमचा आमदार कोथरूडचा हवा’ या आशयाचे खास पुणेरी फलक झळकले होते.

पुणेरी टोमण्यांनी घायाळ झालेल्या पाटील यांनी अखेर सहवास सोसायटीत भाडयाने का होईना घर घेऊन सासरवाडीतील मंडळींचा मान राखायचा प्रयत्न केल्याचे पाहायला मिळत आहे. एवढेच नव्हे, तर तुम्ही संधी दिली तर मी स्वतःचेही घर करेन, अशी टिपण्णी करत विजयी करण्याचं आवाहनही करायला ते विसरले नाहीत.

चंद्रकांत पाटलांना विरोध करण्यावरुन ब्राह्मण महासंघात फूट

चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावर ब्राह्मण महासंघातच फूट पडल्याचं समोर आलं. ब्राह्मण महासंघाचे प्रवक्ते आनंद दवे यांनी एक पत्रक काढत चंद्रकांत पाटलांना महासंघाचा विरोध असल्याचं जाहीर केलं. मात्र, ब्राह्मण महासंघांचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी असा कोणताही निर्णय झालेला नसल्याचं स्पष्ट केलं. तसेच परस्पर पाठिंब्याचं पत्रक काढणाऱ्या आनंद दवेंवर कारवाई करत त्यांना संघटनेतून हाकलण्यात येईल, असं म्हटलंय.

Non Stop LIVE Update
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.