शरद पवारांच्या हत्येचा कट, पुणे पोलिसांकडे तक्रार दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जीवाला धोका असल्याची तक्रार पुणे पोलिसांकडे दाखल झाली आहे (Sharad pawar murder conspiracy). त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

शरद पवारांच्या हत्येचा कट, पुणे पोलिसांकडे तक्रार दाखल

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जीवाला धोका असल्याची तक्रार पुणे पोलिसांकडे दाखल झाली आहे (Sharad pawar murder conspiracy). त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल झाली आहे. या तक्रारीतून आरोपींवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते लक्ष्मीकांत खांबिया यांनी शरद पवार यांच्या जीवाला धोका असल्याची लेखी तक्रार पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनला दिली. काही वेबपोर्टलवरुन शरद पवार यांच्याविरोधात चिथावणीखोर भाषणांचे व्हिडीओ टाकले जात आहेत. त्याखाली शरद पवार यांच्याविरोधात टोकाच्या कमेंट केल्या जात आहेत. या कमेंटवरुन शरद पवार यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याचा आरोप लक्ष्मीकांत खांबिया यांनी केला आहे.

सोशल मीडियात सातत्यानेच शरद पवार यांच्यावर जोरदार टीका होत असते. यात चिथावणीखोर भाषाही वापरली जाते. याची दखल घेऊन तातडीने अशा कमेंट करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी लक्ष्मीकांत खांबिया यांनी केली आहे.

Sharad pawar murder conspiracy

संबंधित व्हिडीओ :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *