कोण म्हणतं पुण्याचा हट्ट सोडला, अजितदादा म्हणतात चर्चा सुरु आहे!

पुणे: काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडीबाबत झालेली चर्चा खेळीमेळीत झाली. तुटेपर्यंत ताणणार नाही, समविचारी पक्षांना एकत्र घेऊन जातीयवादी पक्षांविरोधात मोट बांधू असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार अजित पवार यांनी सांगितलं. ते पुण्यात बोलत होते. सध्या 40 जागांचं वाटप झालं आहे. आठ जागांचं वाटप राहिलं आहे, त्यात पुण्याच्या जागेचाही समावेश आहे, असं अजित पवार म्हणाले. अजित […]

कोण म्हणतं पुण्याचा हट्ट सोडला, अजितदादा म्हणतात चर्चा सुरु आहे!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:48 PM

पुणे: काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडीबाबत झालेली चर्चा खेळीमेळीत झाली. तुटेपर्यंत ताणणार नाही, समविचारी पक्षांना एकत्र घेऊन जातीयवादी पक्षांविरोधात मोट बांधू असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार अजित पवार यांनी सांगितलं. ते पुण्यात बोलत होते. सध्या 40 जागांचं वाटप झालं आहे. आठ जागांचं वाटप राहिलं आहे, त्यात पुण्याच्या जागेचाही समावेश आहे, असं अजित पवार म्हणाले. अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे पुण्यातील जागेचा वाद पुन्हा चर्चिला जाण्याची शक्यता आहे. कारण कालच राष्ट्रवादीने पुण्याच्या जागेचा हट्ट सोडल्याचं सांगण्यात येत होतं. पुण्याची जागा काँग्रेसकडेच राहणार अशी माहिती मिळाली होती, मात्र आज अजित पवारांनी पुण्याच्या जागेचा घोळ अद्याप कायम असल्याचं सांगून पुन्हा संभ्रम निर्माण केला आहे.

वाचा : त्या 6 जागा, जिथे काँग्रेस-राष्ट्रवादीला जिंकण्याची पूर्ण हमी!

अजित पवार म्हणाले, “आठ जागांचं वाटप राहिलं आहे. त्यात पुण्याच्या जागेचाही समावेश आहे. जिथे आमची ताकद जास्त आहे तिथे मित्रपक्षांनी जागा सोडावी, जिथे आम्हाला अपयश आलं, ती जागा आम्ही मित्रपक्षांना सोडू.  जातीयवादी पक्षांना सामोरे जाण्यासाठी पारंपरिक जागा हा वाद नाही”

सहा जागांचा घोळ

दरम्यान, 8 पैकी सहा जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादीची खलबतं सुरु आहेत. त्यामध्ये अहमदनगर, रत्नागिरी सिंधुदुर्ग, नंदूरबार, यवतमाळ, औरंगाबाद आणि रावेर या जागांचा समावेश आहे.

अहमदनगरसाठी काँग्रेस इच्छुक

1) अहमदनगरची जागा सध्या राष्ट्रवादीकडे असली तरी तिथे विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे इच्छुक आहेत. त्यांच्यासाठी काँग्रेसला ही जागा हवी आहे.

सिंधुदुर्ग कुणाकडे?

2) तर सिंधुदुर्गची जागा ही राष्ट्रवादीनं मागितली आहे. काँग्रेसकडे त्यासाठी तुल्यबळ उमेदवार नसल्याचं कारण दिलं जात आहे. पण राणे कुटुंबियांसाठी तर ही जागा राष्ट्रवादी मागत नाही ना अशी चर्चा आहे.

नंदुरबारसाठी दोघांचा हट्ट

3) नंदुरबारमधली जागा काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ आहे. तिथून काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांची कन्या निर्मला गावित यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. पण राष्ट्रवादी मात्र एका भाजपच्या विद्यमान खासदारासाठी या जागेवर दावा ठोकण्याचा प्रयत्न करत आहे.

यवतमाळवर राष्ट्रवादीचा दावा

4) यवतमाळच्या जागेवर राष्ट्रवादीनं दावा सांगितला आहे. तिथून काँग्रेसकडून माणिकराव ठाकरे किंवा शिवाजीराव मोघे यांना तिकीट द्यायचा प्रयत्न केला जात आहे. पण राष्ट्रवादी मनोहर नाईक यांच्यासाठी आग्रही आहे.

औरंगाबादचा तिढा कसा सुटणार?

5) औरंगाबादच्या जागेचा तिढाही असाच आहे. औरंगाबादची जागा काँग्रेसकडे असली तरी तिथे राष्ट्रवादी काँग्रेस सतीश चव्हाण यांच्यासाठी इच्छुक आहे.

रावेरची जागा कुणाला?

6) तर रावेरच्या जागेवर स्थानिक नेत्यांनी काँग्रेसनं ही जागा लढावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. रावेरमध्ये माजी खासदार उल्हास पाटील या जागेसाठी आग्रही आहे. तर गेल्यावेळी मनिष जैन यांनी काँग्रेसकडून राष्ट्रवादीकडे जात निवडणूक लढवली होती.

त्यामुळं सहा जागांचा तिढा सुटला तर आघाडी प्रत्यक्षात येईल आणि हा तिढा समजुतीनं सोडवण्याचा काँग्रेस राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे.

संबंधित बातम्या 

त्या 6 जागा, जिथे काँग्रेस-राष्ट्रवादीला जिंकण्याची पूर्ण हमी!

अखेर राष्ट्रवादीने पुण्याच्या जागेचा हट्ट सोडला!  

भाजपच्या गुप्त सर्व्हेचे आकडे उघड, शिवसेनेसोबतच्या युतीसाठी धडपड 

धक धक गर्ल पुण्यातून लोकसभेच्या रिंगणात? 

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.