Pune Lockdown | पुण्यात पाच दिवस दूध, औषधांशिवाय सर्व बंद, भाजी खरेदीसाठी झुंबड

13 ते 18 या पाच दिवसात दूध आणि औषधांशिवाय काहीही मिळणार नाही. त्या पार्श्वभूमीवर भाजी खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. crowd at Pune Market Yard

Pune Lockdown | पुण्यात पाच दिवस दूध, औषधांशिवाय सर्व बंद, भाजी खरेदीसाठी झुंबड

पुणे : पुण्यात दहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. 13 ते 23 जुलपर्यंत लॉकडाऊन असेल. पण 13 ते 18 या पाच दिवसात दूध आणि औषधांशिवाय काहीही मिळणार नाही. त्या पार्श्वभूमीवर भाजी खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. महात्मा फुले मंडईत सकाळपासून गर्दी झाली. आठवड्याचा भाजीपाला खरेदी करण्यावर ग्राहकांचा भर आहे. ग्राहकांची गर्दी आणि मागणी नेहमीच्या तुलनेत वाढली आहे. ठोक बाजारपेक्षा किरकोळ बाजारात पाच पटींपेक्षा जास्त दरात वाढ झाली. (crowd at Pune Market Yard)

तर महात्मा फुले मंडई आणि डेक्कन मंडईत दहा ते बारा टक्के दरवाढ झाली आहे. शहरात वेगवेगळ्या ठिकाणच्या परिस्थितीनुसार वेगवेगळे दर आहेत. शनिवारी मार्केट यार्डातील गुलटेकडी मुख्य मार्केट यार्ड बंद असल्यानंही दरांवर परिणाम झाला आहे. (crowd at Pune Market Yard)

गुलटेकडी मुख्य मार्केट यार्डातील भाज्यांचे दर

 • कोबी सहा ते आठ रुपये किलो
 • फ्लॉवर 12 ते 15 रुपये किलो
 • हिरवी मिरची 20 ते 30 रुपये किलो
 • शिमला मिरची 30 ते 35 रुपये किलो
 • टोमॅटो 20 ते 25 रुपये किलो
 • कोथिंबीर जुडी 8 ते 10 रुपये
 • गवार 15 ते 20 किलो
 • वांगी 10 ते 15 किलो
 • कांदा 5 ते 8 किलो
 • बटाटा 20 ते 23 किलो
 • लसूण 50 ते 80 किलो
 • गाजर 12 ते 14 किलो

पुण्यातील महात्मा फुले मंडई येथील भाज्यांचे दर

 • कोबी 30 रुपये किलोवरुन 40 रुपये किलो
 • फ्लॉवर 40 रुपये किलोवरुन 50 रुपये किलो
 • दुधी भोपळा 40 रुपये किलो दर कायम
 • भेंडी 40 रुपये किलोवरून 50 रुपये किलोवर
 • वांग्याचा दर 40 रुपये कायम आहे
 • शिमला मिरची 60 रुपये दर कायम
 • टोमॅटो 30-40 रुपये किलो
 • काकडी 40 रुपये दर स्थिर
 • गवार 40 रुपये किलो वरुन 60 रुपये किलो
 • गाजर 40 रुपये किलो
 • कोथिंबीर एक जुडी 15 ते 20 रुपये
 • मिरची 110-120 रुपये किलो

डेक्कन भाजीपाला विक्री दर

 • कोबी 30 ते 40 रुपये किलो वरून 60 रुपये किलोवर
 • फ्लॉवर 60 ते 80 रुपये किलोवरुन शंभर रुपये किलो
 • दुधी भोपळा 40 रुपये किलोवरुन 60 ते 80 रुपये किलो
 • भेंडी 60 रुपये किलोवरुन 80 ते 100 रुपये किलो
 • वांगी 40 ते 60 रुपये किलोवरुन 80 ते 100 रुपये किलो
 • शिमला मिरची 80 रुपये किलोवरून 100 रुपये
 • टोमॅटो 40 रुपये किलो वरून 80 रुपये किलो
 • कोथिंबीर 16 रुपये जुडी वरुन 30 ते 40 रुपये
 • कांदा 20 रुपये वरुन तीस रुपये किलो
 • 120 kg मिरची

(crowd at Pune Market Yard)

संबंधित बातम्या 

लॉकडाऊनपूर्वी भाजी-पाला खरेदीच्या सूचना, पुण्यात वाईन शॉप्सबाहेर झुंबड   

भाजीपाला भरुन ठेवा, खरेदी असेल ती करुन घ्या, पुणे-पिंपरीत कडक लॉकडाऊन 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *