Flood | पुरामुळे आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू, बचावकार्य, पूरस्थितीची A टू Z माहिती

पश्चिम महाराष्ट्राला पावसाने झोडपून काढलं आहे. पुणे, सातार, सांगली आणि कोल्हापूरमध्ये पावासाने हाहा:कार माजवल्याने सर्वच ठिकाणी पूरस्थिती  (Flood) आहे.

Flood | पुरामुळे आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू, बचावकार्य, पूरस्थितीची A टू Z माहिती

पुणे : पश्चिम महाराष्ट्राला पावसाने झोडपून काढलं आहे. पुणे, सातार, सांगली आणि कोल्हापूरमध्ये पावासाने हाहा:कार माजवल्याने सर्वच ठिकाणी पूरस्थिती  (Flood) आहे. पुणे विभागातील 5 जिल्ह्यात पावसाचे 16 बळी गेले आहेत. विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर (Deepak Mhaisekar) यांनी याबाबतची माहिती दिली. मृतांमध्ये पुणे 4, सातारा 7, सांगली 2, सोलापूर 1 आणि कोल्हापुरातील 2 जणांचा समावेश आहे.

विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर काय म्हणाले?

पुणे विभागात 137 टक्के पाऊस झाला आहे. 58 तालुक्यापैकी 30 तालुक्यात अतिवृष्टी झाली. सातारा, सांगली आणि कोल्हापूरमध्ये पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा आहे, अशी माहिती दीपक म्हैसेकर यांनी दिली.

पंढरपुरात काल 7 हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. पुण्यातील 13,336 नागरिकांना स्थलांतरित केलं आहे.  अलमट्टी धरणातून आता विसर्ग वाढवून चार लाख विसर्ग केला आहे. मात्र अजून सुधारणा झालेली नाही. त्यामुळं तिथं अजून विसर्ग वाढवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करत आहेत. तर आपण कोयना धरणातून विसर्ग कमी करतोय. पण महाबळेश्वरात पुन्हा पाऊस वाढला आहे.

पाण्याचा निचरा झाल्याने पुण्यातील 40 पैकी सहा पूल पुरातून बाहेर आलेत. साताऱ्या आठ पूल पुरात आहेत. कोल्हापूर-बेळगावचा संपर्क तुटला आहे. तर सांगली-कोल्हापूरही संपर्क नाही. दोन्ही जिल्ह्यात तीन NDRF टीम काम करत आहेत. अजून टीम पाठवत आहे. कोस्ट गार्ड आणि नेव्हीच्या चार टीम कोल्हापूर जाणार आहेत. सांगली-कोल्हापूर दोन्ही जिल्ह्यातील एसटी वाहतूक ठप्प आहे.

साताऱ्यातील सहा गावांत 800 लोकांचा संपर्क तुटला. सांगलीत 18 गावांचा संपर्क तुटल्याने इथल्या 29 हजार लोकांना स्थलांतरित करण्यात आलं.

पुणे विभागात एकूण 1,32,360 लोकांना स्थलांतरित केलं असून अजून संख्या वाढत आहे. तर विभागत 10,882 वीज ट्रानसफॉर्मर बंद झाले असून, दोन लाखांपेक्षा जास्त नागरिकांना फटका बसला आहे.

पाणीपुरवठा

कोल्हापुरातील 390 गावांचा पाणीपुवठा बंद आहे. तिकडे साताऱ्यातील 91 गावांचा पाणी पुरवठा बंद असून, तो पूर्ववत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. वैद्यकीय पथक काम करत आहे.

मदत आणि बचाव पथकं

सध्या rescue, relief and rehabilitation असे काम सुरु आहे. Ndrf- सहा टीम  काम करत आहेत, नेव्ही सध्या पाच टीम असून अजून पाच येत आहे.  NDRF ची 10 पथकं असून आर्मीचे 200 जवान मदतकार्य करत आहेत.

कोल्हापूर, सांगली आणि पुण्यात पावसाने अशी परिस्थिती कधी निर्माण झाली नव्हती. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नका. प्रशानाच्या विनंतीनंतर नागरिकांनी स्थलांतरित व्हावं, सेल्फी घेऊ नये, ही आपत्ती आहे, टुरिझम नाही.

पुरात 16 जणांचा मृत्यू

या पुरात आतापर्यंत सोळा जणांचा मृत्यू झाला आहे.  

  • पुणे-4
  • सातारा-7
  • सांगली-2
  • सोलापूर-1
  • कोल्हापूर-2

पुणे जिल्ह्यातील पूररेषा सर्व्हे सुरु आहे, यात काही अतिक्रमण असेल तर कारवाई करुन हटवू, अशी माहिती दीपक म्हैसेकर यांनी दिली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *