जुन्नरमध्ये नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना अजित पवारांकडून अधिकाऱ्यांच्या कामाचा पंचनामा

जुन्नर तालुक्यात अजित पवारांना वेगळी परिस्थिती जाणवली. तालुक्यात शेतकऱ्यांचे पंचनामे हे अतिशय कमी झाले होते.

जुन्नरमध्ये नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना अजित पवारांकडून अधिकाऱ्यांच्या कामाचा पंचनामा

पुणे : आधी कोरोना आणि आता ‘निसर्ग’ चक्रीवादळ (Ajit Pawar On Junnar Damage Inspection Tour) याचा मोठा फटका कोकणासह पुणे जिह्याला बसला. निसर्ग चक्रीवादळामुळे मावळ, जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्याचे मोठे नुकसान झाले होते. त्याची पाहाणी करण्यासाठी आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे जिल्ह्यात आले होते. यावेळी अजित पवारांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ह्या नुकसानीचा (Ajit Pawar On Junnar Damage Inspection Tour) आढावा घेतला.

पुणे जिल्ह्यात चक्रीवादळाने मोठा हैदोस घातला असून अनेक ठिकाणी सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करत आहे. मात्र, जुन्नर तालुक्यात अजित पवारांना वेगळी परिस्थिती जाणवली. तालुक्यात शेतकऱ्यांचे पंचनामे हे अतिशय कमी झाले होते. त्यावर अजित पवार यांनी जुन्नरमधील अधिकाऱ्यांचा आपल्या शैलीत पंचनामा केला. दोन दिवस झाले, आतापर्यंत पंचनामे व्हायला हवे होते, असे देखील अजित पवारांनी आपल्या अधिकाऱ्यांना खडसावले.

मावळमधील फुल उत्पादकाचे नुकसान पाहण्यासाठी अजित पवार हे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर गेले आणि प्रशासनाला सूचना केल्या. अजित पवार उत्तर पुणे जिल्ह्यात गेले, त्याठिकाणची परिस्थिती त्यांना वेगळीच जाणवली. जुन्नर तालुक्यातील अनेक नुकसानग्रस्त नागरिकांचे पंचनामेच झाले नसल्याची बाब समोर आली (Ajit Pawar On Junnar Damage Inspection Tour). त्यात तेथील एक महिला समोर आली, तिने आपल्या घरावरचे पत्रे या वादळात उडून गेल्याची कैफियत अजित पवार यांच्यासमोर मांडली. सबंधित महिलेला अजित पवारांनी धीर दिला आणि आपला मोर्चा प्रशासनाकडे वळविला.

तात्काळ ह्या महिलेच्या नुकसानीचा पंचनामा करा, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. मात्र, त्या अधिकाऱ्यांच्या कामाची पध्दत अजित पवार यांना न पटणारी होती. मग काय अजित पवार यांनी स्वतः जुन्नरमधील अधिकाऱ्यांचा आपल्या शैलीत ‘पंचनामा’ केला. “आता आलात आहात, तर या नुकसानग्रस्तांची माहिती घेऊनच पुढे जा, आता काय इतक्या लांब यायचं, काही रेकॉर्ड बघायचे, या घरावरचा पत्रा उडाला, परत पाहाणी करायची, पुन्हा दुसऱ्यांदा यायचं, वेळ वाया जातो आपला? हे पंचनामे आपल्याला दोन दिवसांत पाहिजे होते”, असे म्हणत संबंधित अधिकाऱ्याला अजित पवारांनी खडसावलं (Ajit Pawar On Junnar Damage Inspection Tour).

संबंधित बातम्या :

पुण्याला चक्रीवादळाचा तडाखा, अजित पवार थेट बांधावर, शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन

चक्रीवादळाने कागदावरील नुकसानीपेक्षा जास्त नुकसान, अनेक ठिकाणी प्रशासन अजूनही पोहोचलेलं नाही : प्राजक्त तनपुरे

कोकणात 5 हजार कोटींचं नुकसान, सरकारने पंचनाम्याआधी तातडीने 500 कोटींची मदत करावी : सुनील तटकरे

रायगडकरांना दिलासा देण्यासाठी आलो आहे, तातडीने 100 कोटी जाहीर : उद्धव ठाकरे

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *