…म्हणून मुख्यमंत्र्यांकडून पुणेकरांची दिलगिरी व्यक्त

होर्डिंग्ज लावल्याने कोणालाही तिकीट मिळत नाही. काम असेल त्यालाच तिकीट मिळेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत भाजप कार्यकर्त्यांना ठणकावून सांगितलं.

...म्हणून मुख्यमंत्र्यांकडून पुणेकरांची दिलगिरी व्यक्त
Follow us
| Updated on: Sep 18, 2019 | 1:28 PM

पुणे : भाजपच्या महाजनादेश यात्रेमुळे पुणेकरांच्या झालेल्या गैरसोयीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलगिरी (Devendra Fadanvis sorrow for Pune) व्यक्त केली. शहरातील फ्लेक्समुळे रुग्णवाहिकेला निर्माण झालेल्या अडथळ्याबद्दलही मुख्यमंत्र्यांनी भाजप कार्यकर्त्यांचे कान टोचले (Devendra Fadanvis sorrow for Pune) आहेत.

‘आमच्या अपेक्षापेक्षा जास्त प्रतिसाद भाजपच्या महाजनादेश यात्रेला (BJP Maha Janadesh Yatra) मिळत आहे. सामान्य माणूस उत्स्फूर्तपणे रस्त्यावर येऊन महाजनादेश यात्रेचं स्वागत करत आहे. आमच्या यात्रेमुळे काही ठिकाणी नागरिकांची गैरसोय देखील झाली. त्याबद्दल पुणेकरांची दिलगिरी व्यक्त करतो. परंतु पुणेकरांनी जो प्रतिसाद यात्रेला दिला त्याबद्दल पुणेकरांचे आभार देखील मानतो’ अशा शब्दात फडणवीसांनी कृतज्ञता व्यक्त केली.

शहरात फ्लेक्सबाजी करणं चुकीचं आहे. भाजप कार्यकर्त्यांना त्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. होर्डिंग्ज लावल्याने कोणालाही तिकीट मिळत नाही. काम असेल त्यालाच तिकीट मिळेल, असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis sorrow for Pune) यांनी ठणकावून सांगितलं.

भाजप आमदार मेधा कुलकर्णी यांनी मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी लावलेलं फ्लेक्स अनधिकृत होतं आणि पक्षाने आदेश देऊनही ते काढलं नाही, असा दावा मनसेने केला होता. या फ्लेक्समुळे वाहतुकीत अडथळा निर्माण होऊन एक अॅम्ब्युलन्स काही काळासाठी अडकली होती.

देशात सर्वाधिक गुंतवणूक, सर्वाधिक परकीय गुंतवणूक आणि सर्वाधिक रोजगार महाराष्ट्रात आला. ‘मेक इन महाराष्ट्र’ आणि ‘मॅग्नेटीक महाराष्ट्र’ यामधे जे एमओयू झाले त्यांचं रुपांतर करारामध्ये होण्याचं प्रमाण हे 45 टक्के आहे,

अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार निर्माण झाला, याची आकडेवारी आम्ही जाहीर करु, असंही त्यांनी सांगितलं.

महायुती अभूतपूर्व यश मिळवेल, असा विश्वासही फडणवीसांनी व्यक्त केला. शिवसेना 288 जागा स्वबळावर लढवण्याची चाचपणी करत आहे, ही माहिती तुमची आहे, आमची नाही, असं म्हणत फडणवीसांनी प्रश्न टोलवून लावला.

अमित शाहांच्या उपस्थितीत 19 सप्टेंबरला शिवसेना-भाजप युतीची घोषणा?

जी द्राक्षं मिळत नाहीत, ती आंबट होतात, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसने खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर केलेल्या टीकेबद्दल मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं.

आदित्य ठाकरेंना सल्ला

मी आदित्य ठाकरे यांना सांगेन की झाडांबद्दलचा त्यांचा विचार चांगला आहे. परंतु याच्यामागे कोण दडलंय याचीही माहिती घ्यावी. आम्ही देखील झाडे जगवण्याच्या बाजूने आहोत, टेंडर अबव्ह आल्यानंतर ते सरकार कमी करतं. मुख्यमंत्री कार्यालय कुठल्याही महापालिकेत ढवळा ढवळ करत नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

बारामतीत लाठीचार्जच्या आरोपाला उत्तर

बारामतीत घोषणाबाजी करणारे फक्त सात जण होते. ते पळून गेले. सात जणांवर लाठीचार्ज करावा लगतो का? असा प्रश्न विचारत फडणवीसांनी लाठीचार्ज झाल्याचा दावा फेटाळला. आमचे सात जण शरद पवार यांच्या सभेत जाऊन घोषणा देऊ लागले तर? आमच्या सभेने एवढी का पायाखालची जमीन सरकली? बारामतीत दुसऱ्या कुठल्या पक्षाच्या नेत्यांनी सभा घेऊ नये का? बारामतीत 370 कलम लागू आहे का? असे सवालही मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केले. आमच्याकडे त्यांनी यावं आणि सभा घ्यावी, असं आवाहनही फडणवीसांनी दिलं.

Non Stop LIVE Update
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.