पुण्यात स्पर्धा परीक्षार्थीला घर खाली करण्याचा तगादा, घर मालकावर गुन्हा दाखल

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या परीक्षार्थीला पुण्यात घर मालकाने घर खाली करण्याचा तगादा लावला. यानंतर घर मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे (FIR against Home Owner forcing for rent).

पुण्यात स्पर्धा परीक्षार्थीला घर खाली करण्याचा तगादा, घर मालकावर गुन्हा दाखल

पुणे : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या परीक्षार्थीला पुण्यात घर मालकाने घर खाली करण्याचा तगादा लावला. यानंतर घर मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे (FIR against Home Owner forcing for rent). या प्रकरणी संबंधित स्पर्धा परीक्षार्थीने घरमालकाविरोधात तक्रार दाखल केली होती. यात घर मालक घर भाडे दे नाहीतर, रुम खाली कर, असा तगादा लावत असल्याचं म्हटलं आहे. घर मालकानं घर दुरुस्त करायचा बहाणा करुन भाड्यासाठी घर खाली करण्यास भाग पाडलं होतं, असंही तक्रारदाराने म्हटलं आहे.

पीडित तक्रारदार मुलगी चंद्रपूरहून पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयार करण्यासाठी आली होती. ती सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. पुण्यात ती नवीपेठेतील एका घरात पेईंग गेस्ट म्हणून राहते. मात्र, लॉकडाऊन काळात ही मुलगी महिन्याचे 1700 रुपये घरभाडे देऊ शकली नाही. यानंतर घरमालकाने वारंवार तगादा लावून घर भाडे दे नाहीतर रुम खाली कर, असा तगादा लावला होता. घर मालकाने घर दुरुस्त करायचा आहे, असं निमित्त करत भाड्यासाठी घर खाली करण्यास भाग पाडलं. अखेर पीडित मुलीने याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार नोंदवली.

लॉकडाऊनमुळे सर्वत्र आर्थिक मंदीचं वातावरण आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना आर्थिक समस्या भेडसावत आहे. त्यामुळे सरकारने सक्तीने घर भाडे वसूल करु नये. किमान 3 महिने वसुली पुढे ढकलावी, असे आदेश दिलेले आहेत. मात्र, याकडे घर मालकाने सोयीस्कर दुर्लक्ष केलं. त्यामुळे आरोपी घर मालकावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, पुण्यात आज दिवसभरात 6 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं मनपाहद्दीत आतापर्यंत 320 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. आज दिवसभरात 57 नवीन कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे आता एकूण कोरोना रुग्णांची संख्या 6 हजार 529 इतकी झाली आहे. तसेच दिवसभरात 168 कोरोना रुग्ण उपचारानंतर बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. अशा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या आता 3 हजार 950 इतकी झाली आहे. सध्या पुण्यात 2 हजार 259 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. यातील 174 रुग्णांची स्थिती गंभीर आहे. तर 46 रुग्ण व्हेंटिलेटर आहेत. या रुग्णांवर ससून नायडूसह इतर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. प्रतिबंधित क्षेत्राबरोबरच प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर नव्यानं रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे आता या भागांची पुनर्रचना होणार आहे.

हेही वाचा :

Maharashtra Corona Update | राज्यात 2,361 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांचा आकडा 70 हजारांच्या पार

कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी जामीन द्या, मोक्का गुन्ह्यातील डॉक्टरचा अर्ज, कोर्टाकडून मंजुरी

एकीकडे ‘एक देश, एक रेशन कार्ड’ला सुरुवात, दुसरीकडे रेशन दुकानदारांचं संपाचं हत्यार

FIR against Home Owner forcing for rent

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *