पुण्यात साड्यांच्या दुकानाला भीषण आग, 5 कामगारांचा होरपळून मृत्यू

पुणे : पुण्यातील देवाची ऊरळी येथी राजयोग साडी सेंटरला मध्यरात्री लागलेली भीषण आग आता आटोक्यात आली आहे. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या आणि दहा टँकरना आग आटोक्यात आणण्यात यश आलं आहे. या राजयोग साडी सेंटरमध्ये पाच कामगार अडकले होते. पाचही कामगारांचा आगीत होरपळून आणि धुरामध्ये गुदमरुन मृत्यू झाला. राकेश मेहवाल, राकेश रियाड, धर्मराम बडीयासर, सुरज शर्मा …

fire pune, पुण्यात साड्यांच्या दुकानाला भीषण आग, 5 कामगारांचा होरपळून मृत्यू

पुणे : पुण्यातील देवाची ऊरळी येथी राजयोग साडी सेंटरला मध्यरात्री लागलेली भीषण आग आता आटोक्यात आली आहे. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या आणि दहा टँकरना आग आटोक्यात आणण्यात यश आलं आहे.

या राजयोग साडी सेंटरमध्ये पाच कामगार अडकले होते. पाचही कामगारांचा आगीत होरपळून आणि धुरामध्ये गुदमरुन मृत्यू झाला. राकेश मेहवाल, राकेश रियाड, धर्मराम बडीयासर, सुरज शर्मा आणि धीरज चांडक असे मृत्यूमुखी पडलेल्या कामगारांची नावं आहे.

घटना कशी घडली?

मृत्यूमुखी पडलेले कामगार राजयोग साडी सेंटरच्या दुसऱ्या मजल्यावर झोपले होते. रात्री अचानक आग लागली. राजयोग साडी सेंटरचा मालक दुकानाला बाहेरुन कुलूप लावून, दुकान बंद करत असे. कामगार रोज दुकानात झोपत असत. दुकानाला बाहेरुन कुलूप लावणं पाचही कामगारांच्या जीवावर बेतलं.

अग्निशमन दलाने दुकाने बंद असल्याने पाठीमागील बाजूने जेसीबीने भिंत तोडली आणि मदतकार्य सुरु केलं. मात्र, तोपर्यं पाचही कामगार आगीने होरपळले आणि धुराने गुदमरले होते.

राजयोग साडी सेंटरला नेमकी आग कशामुळे लागली किंवा आगीचं नेमकं कारण अद्याप कळू शकलं नाही.

MAP : आग नेमकी कुठे लागली?

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *