FTII चा विद्यार्थी चार दिवसांपासून बेपत्ता

पुणे : फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) मध्ये कला शाखेत द्वितीय वर्षाला शिकत असलेला, मनोजकुमार हा विद्यार्थी मागील चार दिवसांपासून बेपत्ता आहे. महाविद्यालयातील शिक्षकांसोबत असभ्य वर्तणूक केल्याने विभागप्रमुखांनी मनोजला निलंबित केले होते. त्यामुळे तो नारज झाला होता, अशी माहिती शनिवारी महाविद्यालयातून देण्यात आली. मनोजच्या मित्रांनी डेक्कन पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या प्रभातरोड पोलीस चौकीत हरवल्याची …

FTII चा विद्यार्थी चार दिवसांपासून बेपत्ता

पुणे : फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) मध्ये कला शाखेत द्वितीय वर्षाला शिकत असलेला, मनोजकुमार हा विद्यार्थी मागील चार दिवसांपासून बेपत्ता आहे. महाविद्यालयातील शिक्षकांसोबत असभ्य वर्तणूक केल्याने विभागप्रमुखांनी मनोजला निलंबित केले होते. त्यामुळे तो नारज झाला होता, अशी माहिती शनिवारी महाविद्यालयातून देण्यात आली.

मनोजच्या मित्रांनी डेक्कन पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या प्रभातरोड पोलीस चौकीत हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. सध्या पुढील तपास पुणे पोलीस करत असून मनोजचा शोध सुरु आहे. मनोज हा मूळचा वाराणसीचा आहे, तर नुकतेच सहा महिन्यांपूर्वी त्याचे लग्न झाले होते.

“मोनज कुमार (31) आणि अजून एका विद्यार्थ्याला मागील महिन्यात निलंबित करण्यात आलं होतं. मनोज गायब झाल्याची माहिती आम्हाला 16 जानेवारीला मिळाली आणि दुसऱ्या दिवशी आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दिली”, असं एफटीआयआयचे निर्देशक भुपेंद्र कैन्थोला यांनी सांगितले.

21 डिसेंबरला जाहीर केलेल्या पत्रानुसार, मनोजकुमार आणि त्याचा सहकारी या दोघांनी 19 डिसेंबरला कला निर्देशन आणि प्रोडक्शन डिझाईन विभाग प्रमुख विक्रम वर्मा यांच्यासोबत असभ्य वर्तणूक केले होते. शिक्षकांची माफी मागण्यासाठी त्याला 24 तासांचा अवधी दिला होता. मात्र काही उत्तर न आल्याने त्याला निलंबित करण्यात आले.

पोलीस सध्या मनोजचा शोध घेत असून झालेल्या प्रकरणाचा अधिक तपास करत असल्याचे डेक्कन वरीष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी सांगितले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *