पुण्यात भररस्त्यावर तरुणीचा विनयभंग, मदतीला आलेल्या मित्रालाही मारहाण

पुणे : विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात आणखी एक गुन्हेगारी घटना समोर आली आहे. पुण्यात तरुणीसह मित्राला बेदम मारहाण करुन तरुणीचा विनयभंग करण्यात आलाय. रविवारी पहाटेच्या सुमारास दोघा तरुणांनी पाठलाग करुन तरुणीला मारहाण केली. या प्रकरणी 21 वर्षीय अविनाश धनकुडे आणि 22 वर्षीय शेखर कळमकरला अटक करण्यात आली आहे. दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. पीडित तरुणी […]

पुण्यात भररस्त्यावर तरुणीचा विनयभंग, मदतीला आलेल्या मित्रालाही मारहाण
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:14 PM

पुणे : विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात आणखी एक गुन्हेगारी घटना समोर आली आहे. पुण्यात तरुणीसह मित्राला बेदम मारहाण करुन तरुणीचा विनयभंग करण्यात आलाय. रविवारी पहाटेच्या सुमारास दोघा तरुणांनी पाठलाग करुन तरुणीला मारहाण केली. या प्रकरणी 21 वर्षीय अविनाश धनकुडे आणि 22 वर्षीय शेखर कळमकरला अटक करण्यात आली आहे. दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

पीडित तरुणी ही शिक्षिका आणि सामाजिक काम करते. रविवारी पहाटे एका हॉटेलमधील पार्टीतून ती मित्राकडे जात होती. यावेळी दुचाकीवर जाणार्‍या तरुणीचा अविनाश आणि शेखरने पाठलाग केला. एका सोसायटीजवळ दोघांनी तरुणीची छेड काढली, यावेळी तरुणीने मित्राला बोलावल्यावर दोघांना बेदम मारहाण करण्यात आली.

पीडितेच्या मित्राला खाली पाडून मारहाण केली, तर तरुणीचा विनयभंग करण्यात आला. या मारहाणीची दृश्य सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहेत. सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या पुण्यात भररस्त्यात तरुणीचा अशा पद्धतीने विनयभंग झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय.

Non Stop LIVE Update
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.