पुण्यात 78 वर्षात एकदाही वीज न वापरणारी महिला

पुणे : अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. मात्र, आता विजही तितकीच मूलभूत गरज झाली आहे. काही काळ वीज गेली, तरी आपण हतबल होतो. मात्र, पुण्यातील निवृत्त प्राध्यापिका डॉक्टर हेमा साने यांनी त्यांच्या जन्मापासून आतापर्यंत विजेचा कधीही उपयोगच केला नाही. मागील 78 वर्षांपासून डॉ. हेमा विजेशिवाय आनंदी जीवन जगत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या घराच्या आवारात […]

पुण्यात 78 वर्षात एकदाही वीज न वापरणारी महिला
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:47 PM

पुणे : अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. मात्र, आता विजही तितकीच मूलभूत गरज झाली आहे. काही काळ वीज गेली, तरी आपण हतबल होतो. मात्र, पुण्यातील निवृत्त प्राध्यापिका डॉक्टर हेमा साने यांनी त्यांच्या जन्मापासून आतापर्यंत विजेचा कधीही उपयोगच केला नाही.

मागील 78 वर्षांपासून डॉ. हेमा विजेशिवाय आनंदी जीवन जगत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या घराच्या आवारात घनदाट झाडे वाढवली आहे. तेथे गेल्यास एखाद्या जंगलात आल्यासारखा अनुभव येतो. मात्र, ते दृश्य पुण्यातील प्रसिद्ध आणि गजबजलेल्या बुधवार पेठेतील आहे. डॉ. हेमा पक्षांच्या किलबिलाटात आणि निसर्गाच्या सानिध्यातच राहतात. त्यांच्या घराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गेल्या 78 वर्षांमध्ये त्यांनी एकदाही वीज वापरली नाही. त्यांनी आजपर्यंत निसर्गाच्या सानिध्यात कसे जीवन व्यथित केले याची आता अनेकांना उत्सुकता आहे.

कोण आहेत हेमा साने?

डॉ. हेमा साने यांनी वनस्पतीशास्त्रात पीएचडी केली आहे. पुण्यातील प्रसिद्ध गरवारे महाविद्यालयात त्यांनी 35 वर्षे शिकवण्याचे काम केले. अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे पीएचडी पूर्ण केल्या. हे सारं घडलं तेही विजेशिवाय आणि मिणमिणत्या पणत्यांच्या उजेडात. यावर प्रश्न विचारल्यास आदिवासी भागात आहे का वीज? असा उलट प्रश्न त्या विचारतात.

विजेशिवायच डॉ. हेमा साने यांनी भरपूर अभ्यास आणि लिखाण केले आहे. त्याचबरोबर वनस्पती शास्त्र, वनस्पती ललितलेखन, ऐतिहासिक स्वरुपाची अनेक पुस्तकंही लिहिली. अनेक दैनिकांसह आकाशवाणीसाठीही त्या सतत लिहितात, तेही विजेशिवायच. असे असले तरी अजूनही त्यांची नजर अगदी चांगली आहे. साने यांनी आतापर्यंत वनस्पती शास्त्रावर 30 पुस्तके, वनस्पती ललित लेखनावर 10 पुस्तके आणि ऐतिहासिक स्वरुपाची 2 पुस्तके लिहिली आहेत.

पुण्याच्या मध्यवर्ती भागात निसर्गपूरक घर

विपुल विद्वत्ता आणि सधन घरातील डॉ. हेमा सानेंच्या गरजा अगदी मर्यादित आहेत. त्यामुळे आहे या परिस्थितीत त्या आनंदी जीवन जगतात. बुधवार पेठेत काही गुंठ्यांमध्ये त्यांचा वाडा आहे. ठरवलं असतं, तर त्या काहीही करु शकल्या असत्या. मात्र, त्यांनी निसर्गाची कास धरणे पसंत केले. त्यांच्या घराच्या जुन्या लाकडी दरवाज्यातून प्रवेश करताच घनदाट झाडं नजरेस पडतात. पक्षांचा किलबिलाट कानावर पडतो. पुढे गेल्यावर पडझड झालेलं झोपडीवजा घर नजरेत येतं. दारात निवांत झोपलेला कुत्रा आणि तेथेच  गुण्यागोविंदाने राहणारं मांजरही. घरात पलंगावर वेगवेगळी पुस्तकं दिसतात आणि पुस्तकांच्या गराड्यात अंधारात चमकणाऱ्या डॉ. साने दिसतात.

“लोकं मला वेडी म्हणतात. काहींना वाटतं हे विकावे आणि चांगले जीवन जगावं. मात्र मला यात आनंद मिळतो.”

– डॉ. हेमा साने

सिमेंटच्या जंगलात डॉक्टर हेमा साने यांनी खरंखुरं जंगल निर्माण केलं

जगभरात जागतिक तापमानवाढीचा परिणाम दिसत आहे. त्याचे पडसाद देशातही पडत आहेत. पुण्यात तापमान 43 अंशावर गेलं. वृक्षतोड करुन सिमेंटचं जंगल वाढल्याने पर्यावरणाचा ऱ्हास झाला. अशा परिस्थितीत सिमेंटच्या जंगलात डॉक्टर हेमा साने यांनी खरंखुरं जंगल निर्माण केलं आहे. डॉक्टर साने यांची उर्जा बचतीची आणि पर्यावरणाच्या सानिध्यात राहण्याची जीवनशैली ही “ठेविले अनंती, तैसेच राहावे, चित्ती असो द्यावे समाधान”, या प्रकारची आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.