पत्नीच्या हत्येनंतर वृद्धाचा गळफास, पुण्यातील कर्वेनगर हादरले

पुण्यात आजारपणाला कंटाळून एका ज्येष्ठ नागरिकाने आपल्या पत्नीची गळा दाबून हत्या (Husband kill wife Pune) केली.

पत्नीच्या हत्येनंतर वृद्धाचा गळफास, पुण्यातील कर्वेनगर हादरले

पुणे : पुण्यात आजारपणाला कंटाळून एका ज्येष्ठ नागरिकाने आपल्या पत्नीची गळा दाबून हत्या (Husband kill wife Pune) केली. त्यानंतर स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना पुण्यातील गंगा विष्णू संकुल, कर्वेनगर येथे घडली (Husband kill wife Pune).

अविनाश हेमंत गोरे (69 ) आणि वैशाली हेमंत गोरे (66) अशी मृतांची नावं आहेत. आजाराला कंटाळून आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी पती अविनाश गोरे यांनी लिहून ठेवली आहे. याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करुन सहायक पोलीस निरीक्षक सचिन धामणे यांनी फिर्याद दिली आहे.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

अविनाश गोरे हे एलआयसीमध्ये स्टेनो ग्राफर होते. त्यांना एक कन्या असून ती विवाहित आहे. त्या सिंहगड रोडला वास्तव्यास आहेत. त्यामुळे कर्वेनगरमध्ये ते दोघेच पती-पत्नी राहत होते. पत्नी वैशाली गोरे यांना वयोमानानुसार अनेक व्याधी होत्या. त्यांच्या आजारपणाला कंटाळून अविनाश गोरे यांनी आपल्या पत्नीचा गळा दाबून खून केल्याचा आरोप आहे. त्यानंतर स्वत: ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

कर्वेनगर पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यासोबत या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

संबंधित बातम्या :

लॉकडाऊनमध्ये कामधंदा नाही, आर्थिक अडचणीतून वाद, जन्मदात्या बापाकडून मुलाची हत्या

लॉकडाऊनपूर्वीच नोकरी गेली, पुण्यात 22 वर्षीय तरुणीची आत्महत्या

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *