रुग्णाच्या सूपमध्ये रक्ताने माखलेले कापसाचे बोळे, जहांगीर रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

पुणे : रुगणालय हे एक असं ठिकाण आहे जिथे रुग्ण आजारपणातून मुक्त होण्यासाठी जात असतात. मात्र, जर हेच रुग्णालय रुग्णाच्या जीवाशी खेळ करत असेल तर रुग्णांनी जायचं कुठे? असा प्रश्न सध्या पुणेकरांसमोर पडला आहे. पुण्यातील जहांगीर रुग्णालयात रुग्णांना देण्यात येणाऱ्या सूपमध्ये चक्क रक्ताने माखलेले कापसाचे बोळे सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दिवसा-ढवळ्या पुण्यात रुग्णाच्या जीवाशी …

Patient served a soup which has blooded cotton, रुग्णाच्या सूपमध्ये रक्ताने माखलेले कापसाचे बोळे, जहांगीर रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

पुणे : रुगणालय हे एक असं ठिकाण आहे जिथे रुग्ण आजारपणातून मुक्त होण्यासाठी जात असतात. मात्र, जर हेच रुग्णालय रुग्णाच्या जीवाशी खेळ करत असेल तर रुग्णांनी जायचं कुठे? असा प्रश्न सध्या पुणेकरांसमोर पडला आहे. पुण्यातील जहांगीर रुग्णालयात रुग्णांना देण्यात येणाऱ्या सूपमध्ये चक्क रक्ताने माखलेले कापसाचे बोळे सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दिवसा-ढवळ्या पुण्यात रुग्णाच्या जीवाशी खेळ करणाऱ्या जहांगीर रुग्णालयातील या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

जहांगीर रुग्णालयात गेल्या 29 एप्रिलला महेश सातपुते यांच्या पत्नी प्रसुतीसाठी दाखल झाल्या होत्या. त्याच दिवशी संध्याकाळी महेश यांच्या पत्नीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी महेश यांच्या पत्नीला रुग्णालयातील जेवण घेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांच्या पत्नीला जेवणापूर्वी सुप देण्यात आले. सुरुवातील महेश यांच्या पत्नीने सूप घेण्यास नकार दिला. मात्र, महेश यांच्या आग्रहानंतर त्यांनी ते सूप घेतलं. सूप घेत असतानाच, त्यांना या सूपच्या कपात रक्ताने माखलेले कापसाचे बोळे आढळले.

हा किळसवाणा प्रकार पाहून महेश आणि त्यांच्या पत्नीच्या पायाखालची जमीनच सरकली. नुकतंच बाळाला जन्म दिलेल्या महेश यांच्या पत्नीला यामुळे जबरदस्त मानसिक धक्का बसला. यामुळे संतप्त झालेल्या महेश सातपुते यांनी रुग्णालयाविरोधात कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर रुग्णालय प्रशासनाने संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन दिलं आहे. मात्र अद्याप यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

जहांगीर रुग्णालयात याआधीही अशाचप्रकारे अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहे. याबाबत तक्रार केल्यानंतर रुग्णालय प्रशासन मात्र नेहमीच याकडे दुर्लक्ष करते. तसेच याबाबत दोषींना नेहमीच पाठिशी घालते. दरम्यान या सूपमुळे रुग्णालयात इतर रुग्णांना देण्यात येणाऱ्या जेवणाबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. तसेच या धक्कादायक प्रकरणानंतरही  रुग्णालय प्रशासनाने संबंधित व्यक्तीवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी रुग्ण आणि स्थानिक नागरिक करत आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *